
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम येथील रेल्वे स्टेशन जवळ एका जुन्या इमारतीचे पाडकाम करताना महापालिकेच्या स्कायवॉकचे मोठे नुकसान झाले आहे. स्कायवॉकवर इमारतीचा मलबा पडल्याने छत आणि रेलिंग तुटले आहे. स्कायवॉक तुटून देखील पालिकेचे ह प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे येथून नागरिकांचा प्रवास सुरु होता. अखेर सायंकाळी हा मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला.