कोकण

मळेवाडमधील वीजवाहिन्या, खांबांवरील झाडी धोकादायक

CD

swt1717.jpg
71331
मळेवाडः धोकादायक स्थितीत असलेल्या फ्यूज कंडक्टरला काठीचा आधार देण्यात आला आहे.

मळेवाडमधील वीजवाहिन्या,
खांबांवरील झाडी धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ः मळेवाड गावात बऱ्याच ठिकाणी विद्युत वाहिन्या व खांबावर झाडी तसेच वेलींची वाढ झाल्याने ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे वादळी पावसात या ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असतो. गावातील चराटकरवाडी येथे खांबावरील वाहिन्या जमिनीवर लोंबकळत आहेत. फ्यूज देखील तुटलेल्या स्थितीत असून त्याला काठीचा आधार देण्यात आल्याने महावितरणच्या या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या पावसाचे दिवस असून या खांबाच्या बाजूला शेतकऱ्यांची शेती आहे. येथून पुराचे पाणी वाहत असते. वस्ती असल्याने लहान मुले, शेतकरी, ग्रामस्थ यांची सतत ये-जा असते. या खांबावरील तुटलेल्या वाहिन्या, काठीचा आधार दिलेला फ्यूज बदलण्याबाबत महावितरणचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महावितरण एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करून पुढील दुर्घटना टाळावी, अशी मागणी होत आहे.
......................
swt1718.jpg
71332
बांदाः निमजगा शाळेत मुलांना छत्र्या वाटप करताना ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

निमजगा शाळेत मुलांना
ठाकरे शिवसेनेकडून छत्र्या
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा शहर ठाकरे शिवसेनेकडून निमजगा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आज छत्री वाटप करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ओंकार नाडकर्णी, राजन येडवे, भाऊ वाळके, राजदीप पावसकर, हनुमंत सावंत, गिरीश भोगले, बाळा बहिरे, अभिजित देसाई, सुंदर गवंडे, विशू पावसकर, सोनाली राणे, ग्रामपंचायत सदस्या रिया येडवे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Raid on Congress MLA : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर 'ED'चे छापे; कोट्यवधींचे सोने अन् रोकड जप्त

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

Latest Marathi News Live Updates : छत्रपती संभाजी नगर तालुक्यात ढगफुटी

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

SCROLL FOR NEXT