-ratchl१७४.jpg-
२५N७१३५९
चिपळूण ः शहरातील शंकरवाडी येथील नलावडे बंधाऱ्यामुळे वाशिष्ठीचे शहरात शिरणारे पाणी रोखण्यात यश आले आहे.
----
बंधाऱ्यामुळे शंकरवाडी, मुरादपूर सुरक्षित
वाशिष्ठीचे पाणी वाढूनही पूर नाही; २७५ मीटरची संरक्षित भिंत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या प्रवाहाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्याच अनुषंगाने गाळ उपशासह नलावडे बंधारा उभारण्यात आला. अवघ्या सहा महिन्यात हे काम पूर्णत्वास गेले. सोमवारी येथे झालेल्या मुसळधार पावसात वाशिष्ठी नदीची पाणीपातळी वाढूनही त्याचा फटका बसला नाही. या बंधाऱ्यामुळे वाशिष्ठीचे पाणी शहरात शिरले नाही. त्यामुळे या बंधाऱ्याची उपाययोजना यशस्वी ठरल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
पुराची तीव्रता कमी करण्यासाठी नलावडे बंधारा उभारला असून, तो चिपळूणचा महापूर नियंत्रणात आणण्यासाठी तितकाच फायदेशीर ठरत आहे. शहरामध्ये शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडे बंधारा) जुने दगडी बांधकाम केले होते; परंतु २००५च्या पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून दरवर्षीच वित्तहानी होत होती. २०२१च्या महापुरातही मोठा फटका या भागासह शहराला बसला. यामुळे या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी चिपळूण बचाव समितीसह स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने होत होती. त्या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी पावसाळ्यापूर्वी येथील संरक्षक भिंत उभारणीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मंजुरीसाठी योगदान दिले. अवघ्या सहा महिन्यात हे काम मार्गी लागले. वाशिष्ठी किनारी २७५ मीटर लांबी व १२ मीटर उंचीची ही भिंत आहे. गेले दोन दिवस येथे सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वाशिष्ठीने जवळपास इशारा पातळी गाठली होती. तरीही नलावडे बंधाऱ्यामुळे शहरातील शंकरवाडी व मुरादपूर परिसरात पाणी भरले नाही.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.