कोकण

उद्योगपती रवींद्र प्रभुदेसाई यांचा रविवारी

CD

rat१८p४.jpg-
२५N७१४५६
रवींद्र प्रभुदेसाई

रवींद्र प्रभुदेसाई यांचा रविवारी सत्कार
कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे आयोजन ; डी.लिट. पदवी प्राप्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे उद्योगपती, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र वामन प्रभुदेसाई यांचा सत्कार येत्या रविवारी (ता. २२) करण्यात येणार आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने (पुणे) डी. लिट. (डॉक्टरेट) पदवी प्रदान करून श्री. प्रभुदेसाई यांना सन्मानित केले. या सन्मानाचा आनंद साजरा करण्यासाठी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे त्यांचा रविवारी दुपारी ४.३० वाजता शेरे नाका येथील संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात गौरव करण्यात येणार आहे. याप्रसंगी गौरवमूर्तीच्या हस्ते ‘कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
उद्योगपती रवींद्र प्रभुदेसाई यांना वडिलांकडून उद्योजकीय वारसा मिळाला. त्यांनी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि कंपनीची स्थापना केली. त्यांनी कंपनीद्वारे ११ विभागात नावीन्यपूर्ण उत्पादने तसेच कृषी पर्यटन सुरू केले. कंपनी आयएसओ मानांकन प्राप्त आहे. भारतात सर्वत्र आणि २६ परदेशांतही पितांबरीची उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांना यापूर्वी यशस्वी उद्योजक पुरस्कार, उद्योग श्री पुरस्कार, कोकण आयडॉल, इंडियाज ग्रेटेस्ट ब्रॅंड्स, कऱ्हाडे भूषण पुरस्कार आदी ३५ हून अधिक पुरस्कार लाभले आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण संघ, विश्व हिंदू परिषद, कोकण भूमी प्रतिष्ठान, सॅटर्डे क्लब आदी दहाहून अधिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी आहेत. या कार्यक्रमाला कऱ्हाडे ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि उपाध्यक्ष मानस देसाई यांनी केले आहे.
------
पुस्तकाची पाचवी आवृत्ती
कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाचे लेखन (कै.) विष्णू वासुदेव आठल्ये (शिपोशी) यांनी केले आहे. या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन १९४७ मध्ये झाले होते. पुस्तकाची वाढती मागणी लक्षात घेता यावर्षी पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bacchu Kadu: भारत गणेशपुरेंची सूचना अन् राज ठाकरेंमुळे बच्चू कडूंची राजकारणात एन्ट्री! काय आहे भन्नाट किस्सा

Video : पुरात अडकले जोडपे, पतीची विनंती, आधी माझ्या पत्नीला वाचवा कारण... हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली लाखोंची मने

Krishna Janmashtami 2025 puja Muhurat: यंदा 15 की 16 ऑगस्ट? श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि पूजा मुहूर्त

पुण्यात IT इंजिनिअरकडून बँक मॅनेजरच्या घरात चोरीचा प्रयत्न; २ फ्लॅटचं कर्ज, नोकरी गेल्यानं हफ्त्याच्या टेन्शनमध्ये कृत्य

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ म्हणतात, ‘शक्तिपीठ’ होणार; शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन

SCROLL FOR NEXT