
पुण्यात नोकरी गमावलेल्या आयटी अभियंत्यानं कुरिअरवाला असल्याचं सांगत एका बँक अधिकाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न केला. आयटी अभियंत्यानं बंदुकीचा धाक दाखवून बँख व्यवस्थापक आणि त्याच्या मुलाला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र बँक व्यवस्थापकाच्या दुसऱ्या मुलाने त्याला पकडल्यानं चोरीचा डाव फसला. या प्रकरणी पोलिसांनी ४० वर्षीय व्यक्तीला अटक केलीय. तो मणिपूरचा असून बेरोजगार आहे. कर्जात बुडाल्यानं त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलंय.