
चीनमध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. पुराचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक एक हृदयस्पर्शी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, पुरात अडकलेला एक व्यक्ती बचाव पथकाला आपल्या जीवाची पर्वा न करता आधी आपल्या पत्नीला वाचवा अशी विनंती करताना दिसत आहे. या २७ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपने सोशल मीडियावर लोकांना भावनिक केले आहे.