कोकण

कशेडी बोगद्याला पुन्हा गळती

CD

७१५९२


कशेडी बोगद्याला पुन्हा गळती
अभियंत्यांकडून पाहणी ः ठोस उपाययोजना सुरू
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १८ : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. कशेडी बोगद्यामध्येदेखील पावसाचा अनुभव वाहनचालकांना मिळत आहे. संबंधित ठेकेदाराकडून बोगद्यात कोसळणारे पाण्याचे धबधबे रोखण्यासाठी सद्यःस्थितीत काम सुरू आहे; मात्र तरीही सिमेंटच्या बांधकामातून पाण्याचे फवारे बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने गळतीच्या या घटना गंभीर असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी पाहणी केली गेली असून, त्यावर ठोस उपाययोजना सुरू आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा हा दोन किलोमीटरचा बोगदा आहे. हे दोन्ही बोगदे सध्या दोन्ही बाजूकडील वाहतुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहेत. भर उन्हाळ्यातदेखील या बोगद्यात पाण्याची गळती सुरू होती. सद्यःस्थितीत पावसामध्ये कशेडी बोगद्याला गळती लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालक आणि दुचाकीस्वारदेखील त्रस्त झाले आहेत. गळती थांबविण्यासाठी व थेट वाहनांवर पडणारे पाणी रोखण्यासाठी कशेडी बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने गळती रोखण्यासाठी काम सुरू केले आहे.

११ ठिकाणांच्‍या गळतीचे काम पूर्णत्वास
कशेडी बोगद्याला लागलेली गळती व बोगद्यात छतावरून कोसळणारे पाणी या घटनेची नुकतीच काही महिन्यांपूर्वी जीओलॉजिकल तज्ज्ञांनी पाहणी केली होती. त्यानुसार सद्यःस्थितीत दोन्ही बोगद्यातील गळतीचे १८ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यातील ११ ठिकाणाचे गळतीचे काम पूर्णत्वास गेले आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी पंकज गोसावी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना याचिका वाचण्याचे आदेश देऊ शकत नाही; उच्च न्यायालयाचे निर्देश

Cab Driver Strike: तोडगा निघाला नाहीतर मुंबई, पुणे, नागपूरमध्ये...; खासगी कॅबचालकांचा इशारा

ED Sends Notice to South Indian Stars: साउथ इंडियन फिल्मस्टार विजय देवरकोंडा, राणा दग्गुबत्ती, प्रकाश राज 'ED'च्या रडारावर!

Prithvi Shaw: भारताच्या क्रिकेटरनं तब्बल १७ किलो वजन केलं कमी! पीटरसन म्हणतोय, 'पृथ्वी शॉला कोणीतरी हे दाखवा'

Crime News : पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; मृतदेह टाकला उसाच्या शेतात, तोंडावर वर्मी घाव, मुलगा आहे सैन्य दलात

SCROLL FOR NEXT