कोकण

बेवारस गोवंशीय जनावरांना खाद्य

CD

swt1914.jpg
71768
तुळसुली तर्फ माणगावः शिवसेना स्थापना दिनाच्या निमित्ताने बेवारस गोवंशीय जनावरांच्या गोशाळेत पशुखाद्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित संजय पडते, दीप्ती पडते, दादा साईल, मंगेश चव्हाण, रेवती राणे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

बेवारस गोवंशीय जनावरांना खाद्य
शिवसेनेचा उपक्रमः कुडाळात पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ः शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेने बेवारस गोवंशीय जनावरांना पशुखाद्याचे वाटप केले. शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने आज विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज तुळसुली तर्फ माणगाव येथे आनंद वारंग यांनी सुरू केलेल्या बेवारस गोवंशीय जनावरांच्या गोशाळेत पशुखाद्य वाटप करण्यात आले. बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी नेण्यात येणारी गोवंशीय जनावरे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून नाईलाजाने सोडून दिलेली तसेच अन्य बेवारस जनावरे यांचे पालनपोषण श्री. वारंग हे तुळसुली व माणगाव या ठिकाणी दोन वर्षांपासून श्रीकृष्ण गोवर्धन गोशाळेच्या माध्यमातून स्वकष्टातून कोणत्याही प्रकारची शासकीय किंवा अन्य मदत न घेता करत आहेत. याठिकाणी सुमारे ६० हुन अधिक गोवंशीय भाकड जनावरे दाखल आहेत. या जनावरांना सुक्या चाऱ्याची कमतरता असल्याचे गोरक्षक स्वरुप वाळके यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आज शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने कुडाळ तालुका शिवसेनेतर्फे या जनावरांसाठी आवश्यक असणारा सुका चारा सुपूर्द करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, शिवसेना पक्षाच्या महिला सेना जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, रेवती राणे, अरविंद करलकर, रत्नाकर जोशी, रचना नेरुरकर, श्रुती वर्दम, अनिकेत तेंडोलकर, स्वरुप वाळके, शुभम नाईक, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Local Body Elections: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धडका दिवाळीनंतरच

Manoj Jarange: ''तुमच्या अंगात खोडय.. पण मोदींनाही हे जड जाईल'', मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Latest Maharashtra News Updates Live : नाशकाच्या मालेगावत मोटारसायकल चोर पोलीस स्थानकातून फरार

फरहान अख्तरचा जबरदस्त कमबॅक! '120 बहादुर' टीझर प्रदर्शित, मराठमोळा अजिंक्य देव दमदार भूमिकेत

Satyapal Malik Death Cause: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; 'या' गंभीर आजाराने होते ग्रस्त, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT