पतसंस्था फेडरेशन
अध्यक्षपदी पिंपळकर
खेड : तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदी राज वैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनची नोंदणीनंतरची पहिली सभा भरणे येथील संतसेना पतसंस्था सभागृहात पार पडली. या सभेत उपाध्यपदी संदीप मोदी, वंदना चिकणे, कार्याध्यक्षपदी अभिनय महाजन, सचिवपदी रमाकांत पाटील, सहसचिवपदी अमित धाडवे, खजिनदारपदी संदीप मोडक यांची निवड करण्यात आली. या वेळी अलिबाग कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाचे संचालक संदीप तांबे यांनी मार्गदर्शन केले. पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात नजरेत भरणारी कामगिरी करून पतसंस्थांना सतावणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्याच्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे फेडरेशनचे नूतन अध्यक्ष पिंपळकर यांनी सांगितले. फेडरेशनचे समन्वयक एम. आर. पाटील फेडरेशन यांनी सूत्रसंचालन केले तर रमाकांत पाटील यांनी आभार मानले.
--------
‘जेसीआय, डायमंड’तर्फे
दप्तरांचे वाटप
खेड : तालुक्यातील जेसीआय आणि डायमंड सलून यांच्यावतीने विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत फुरूस मराठी शाळा क्र. १, फुरूस फळसोंडा, दयाळ पूर्व गौळ, नांदगाव जाखलवाडी, नांदगाव मराठी शाळा क्र. १, कळबंणी वाळंज येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दप्तरांचे वितरण करण्यात आले. या वेळी जेसीआय खेडचे अध्यक्ष अमर दळवी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल जेसीआय खेड व डायमंड सलून यांचे आभार मानले. या प्रसंगी दीपक नलावडे, अमोल दळवी, शैलेश मेहता, अमोल क्षीरसागर, स्वप्नील कदम, दानिश पाटणे, चैतन्य सकपाळ, डॉ. दिग्विजय पवार, नबील पोत्रिक उपस्थित होते.
---------------
आसर शाळेत
पुस्तक दिन साजरा
चिपळूण ः विद्यार्थ्यांनी तुम्ही जे काही आवडीने पाहता त्याचा सखोल अभ्यास करायला हवा. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काय शिकता येईल याचा विचार करावा, असे सांगून प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी विद्यार्थ्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करून ''पुस्तक दिन'' साजरा केला. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सेल्फीपॉइंट सर्वांचे आकर्षण ठरले. शाळेने मांडलेल्या शैक्षणिक साहित्य आणि खेळाच्या साहित्यातून विद्यार्थ्यांनी खेळाचा आनंद घेतला. मुख्याध्यापिका संगीता नाईक यांनी प्रास्ताविक केले. या निमित्ताने शाळेमधील ‘औषधी वनस्पती लागवड’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.