कोकण

संगमेश्वर-संगमेश्वर शास्त्री पूल येथे कॉंक्रिटचा रस्ता खचला

CD

rat27p27.jpg-
73525
संगमेश्वर ः शास्त्री पूल येथे महामार्गावरील पसरलेली खडी.
rat27p28.jpg-
73526
संगमेश्वर ः येथे महामार्गाला गेलेले तडे.
----------
संगमेश्वर शास्त्री पूल येथे काँक्रिटचा रस्ता खचला
ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी; सुरक्षेसाठी मार्ग बंद
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांची दुरवस्था पाहून या भागातील समस्येला कुणी वाली उरलेला नाही, असे म्हणावे लागेल. संगमेश्वर शास्त्री पुलानजीक मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट काँक्रिटचा रस्ता खचला असून, त्याला तडे गेले आहेत. ठेकेदार संबंधित विभागाच्या देखरेखीखाली निकृष्ट काम करत आहे. ठेकेदाराने या मार्गावरील वाहतूक थांबवून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
अनेक ठिकाणी महामार्गाचे निकृष्ट काम केल्याचे उघड झाले. भेगा गेलेल्या ठिकाणी मलमपट्टी करून वाळूचा थर टाकला तरीही धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे पाणी त्या भेगांमध्ये जाऊन तडे रूंदावत असल्याचे दिसून येत आहेत.

कोट
संगमेश्वरनजीक रामकुंड येथील अवघड वळणावर ऐन पावसात मोरीला भराव घालण्याचे काम सुरू असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता असून, हे काम तातडीने बंद करण्यात यावे. येथील मोरीवर मातीचा भराव करण्याऐवजी चक्क दगड टाकले जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाचा एकही अभियंता या निकृष्ट कामाकडे लक्ष देत नसल्याने भविष्यात दगडाच्या भरावामुळे ही मोरी खचली तर त्याला जबाबदार कोण? या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे.
- संजय कदम, सामाजिक कार्यकर्ता, संगमेश्वर.
---------
rat27p21.jpg
73517
संगमेश्वर ः कुरधुंडा येथे संरक्षक भिंतीसमोर लावण्यात आलेला रस्ता बंदचा फलक.
----------
कुरधुंड्यात कोसळलेल्या
संरक्षक भिंतीजवळील रस्ता बंद
उपाययोजनांकडे दुर्लक्ष; निकृष्ट कामाचा ग्रामस्थांना फटका
संगमेश्वर, ता. २७ ः तालुक्यातील कुरधुंडा येथे मुंबई-गोवा महामार्गालगतच्या संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत संबंधित यंत्रणांनी केवळ काम सुरू आहे, असा फलक लावून रस्ताच बंद करून टाकला आहे.
हा रस्ता केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर धार्मिक आणि कृषी दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. याच मार्गाने मुस्लिम बांधव दर्ग्याकडे जात असतात आणि पुढील भागात शेतशिवार आहे. रस्ता बंद असल्याने नित्यनेमाने जाणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विकासाच्या नावाखाली असा बेजबाबदारपणा सहन करावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे. प्रशासन, सत्ताधारी आणि स्थानिक नेते एक तर मौन बाळगून आहेत किंवा हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. पारदर्शकतेची ग्वाही देणारे सत्ताधारी अशा गंभीर प्रकरणावर चिडीचूप का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

कोट
कुरधुंडा येथे संरक्षक भिंतीसमोर लावलेला फलक भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आहे की, काम लांबणीवर टाकण्यासाठी हे स्पष्ट होत नाही. मुंबई-गोवा महामार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये अडथळे, ढिसाळ काम, अपूर्ण रचना आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम सातत्याने समोर येत आहे. हे केवळ अपव्यय नसून, जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अशा कामांच्या चौकशीस विलंब का, दोषींवर कारवाई कधी ?
- परशुराम पवार, अध्यक्ष, प्रवासी वाहतूक संघटना, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT