कोकण

श्रीदेव भैरीची पालखी प्रदक्षिणा, बळ कार्यक्रम

CD

-rat३०p१८.jpg-
२५N७४१६४
रत्नागिरी : ग्रामदैवत श्री देव भैरीची पालखी.
---
श्रीदेव भैरीची पालखी प्रदक्षिणा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ महिन्यातील पालखी उत्सव व बळ कार्यक्रम पारंपारिक पद्धतीत होणार आहे. पहिली ग्रामप्रदक्षिणा शनिवारी (ता. ५) जुलै व दुसरी ग्रामप्रदक्षिणा २० जुलै रोजी होणार आहे. सकाळी १० वाजता श्रीदेव भैरीची पालखी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल.
मंदिरातून पालखी खालची आळी मार्गे मुरलीधर मंदिर, काँग्रेस भुवन, टिळक आळी, झाडगाव येथे पटवर्धन व सावंत (खोत) यांच्याकडे थांबेल. त्यानंतर पुढे जोशी पाळंद मार्गे परटवणे येथे खंडकर खोत यांच्याकडे थांबेल. पुढे फगरवठार येथील लांजेकर कंपाऊंड मधील सहाणेवर थांबेल. नंतर अठरा हाताच्या गणपती मंदिरमार्गे फाटक हायस्कूल, गाडीतळ, गोखले नाका, मारुती आळी येथे येईल. त्यानंतर तेलीआळी कोतवडेकर सहाणेवर थांबून परत मारुती आळीतून पऱ्याची आळी, धमालनीच्या पारावरून विठ्ठल मंदिर मार्गे, मुरलीधर मंदिर, खालची आळीमार्गे रात्री १० वाजता श्री देव भैरी मंदिरामध्ये येईल. गाऱ्हाणे होऊन ग्रामपदक्षिणा कार्यक्रम संपेल. ९ जुलैला दुपारी १२ वाजता भैरीची बळ बाहेर पडणार आहे. ग्रामप्रदक्षिणा व बळ या सर्व उत्सवामध्ये बारा वाड्यांतील सर्व गावकरी, मानकरी, ग्रामस्थ, भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT