
Mumbai Rain Alert: मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. रस्ते, नाले दुतर्फा भरुन वाहत आहेत, रस्त्याने चालणंदेखील अवघड झालेलं आहे. त्यामुळे उद्या मुंबईत शाळांना सुट्टी आहे का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्याचं कारण ठाण्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.