टुडे पान एक मेन
जागतिक फणस दिन विशेष
swt325.jpg व swt326.jpg
75033, 75034
फणसांपासूनची विविध उत्पादने
swt327.jpg
75035
फणसाची झाडे
swt328.jpg
75036
फणसाचे गरे
कोकणात फणसाला नवी झळाळी
व्यवसाईक पिकाकडे वाटचालः प्रक्रियेतून होते कोट्यावधीची उलाढाल
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ः फणसांमध्ये असलेले विविध पोषणयुक्त घटक आणि फणसांपासून तयार केलेल्या विविध उत्पादनांना मिळत असलेली वाढती मागणी यामुळे कधीकाळी व्यावसायीक दृष्ट्या दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या या फळपिकाला कोकणात आता नवी झळाळी मिळाली आहे. आतापर्यत मर्यादीत वापरासाठी ओळखल्या जाणाऱ्या फळांवर प्रकिया करणारे शेकडो प्रकिया उद्योजक उभे राहीले असून त्यातून कोट्यावधीची उलाढाल होत आहे.
जगात ४ जुलै हा दिवस फणस दिन म्हणून ओळखला जातो. जगभरातील काही देशांमध्ये आणि देशांमधील काही राज्यांमध्ये फणस उत्पादन घेतले जाते; मात्र संपूर्ण कोकण फणसासाठी ओळखले जाते. कोकण हेच मुळतः आंबा, काजु, फणस, जांभुळ, सुपारी, नारळ, करवंद, कोकम अशा पिकांसाठी ओळखले जाते. या इतर पिकांचे तुलनेत आंबा, काजूनंतर फणस या फळाचे नाव आपसुक तोंडावर येते. वरून काटेरी आणि आतून मधाळ गोड असेच वर्णन फणसाचे केले जाते. कोकणातील प्रत्येक गावात शेकडो वर्षापूर्वीपासूनच फणस या फळपिकाची झाडे आहेत. फणसाची स्वतंत्र लागवड कुणीही करीत नाही; मात्र घरालगत प्रत्येकाची दोन चार फणसाची झाडे असतातच. १९८० च्या दशकापूर्वी ग्रामीण भागात अन्नधान्य वर्षभर पुरण्याइतके पिकत नव्हते. प्रत्येक जण पावसाळ्यात पुरण्याइतके धान्याची साठवणुक करून ठेवायचे. उन्हाळ्यात मात्र हेच फळ सर्वसामान्यांची कामी येत असे. साधारणपणे एप्रिल, मे आणि जूनचे काही दिवस हे फळ उपलब्ध व्हायचे. त्यामुळे एप्रिलपासून दैंनदिन आहारात फणसाची भाजी असायची. काही लोक तर पुर्ण आहार भाजीचाच घ्यायचे तर काही किरकोळ स्वरूपात जेवणासोबत भाजी घेत असत. डिसेंबर, जानेवारीच्या सुमारास कोवळे फणस तयार होतात. त्या कोवळ्या फणसाची भाजीचा वापर केला जायचा आणि आजही केला जात आहे; परंतु ही भाजी काही मर्यादीत कालावधीपुरताच आणि स्थानिक लोकांना चाखता येत होती; परंतु गेल्या दहा वर्षात फणसांवर जिल्ह्यातील अनेक प्रयोगशील उद्योजकांनी यशस्वी प्रयोग करीत ‘रेडी टु कुक, रेडी टु इट’ अशा संकल्पना राबविल्या. त्यातूनच कोवळ्या फणसांची भाजी पिशवीबंद झाली आणि आता बारमाही उपलब्ध झाली आहे. राज्यासह देशभरातील ग्राहकांपर्यत ती आता पोहोचली आहे. त्याचप्रमाणे कच्च्या गऱ्यांची भाजी देखील ‘रेडी टु इट’मध्ये तयार आहे.
हंगामात रसाळ फणसाच्या गऱ्यापासून आंबा पोळी तयार केली जायची; परंतु आंबा पल्पप्रमाणे फणस पल्प तयार करून तो बाटलीबंद करण्यात काही उद्योजकांना यश आले. त्यामुळे आता बारमाही फणसपोळीची निर्मिती करता येते. याशिवाय फणस फळावर झालेल्या संशोधनातून हे फळ पोषक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षात अनेक उद्योजक या फळांवर प्रकिया करू लागले आहेत. त्यातून अनेकांना स्वंयरोजगारांची द्वारे खुली झाले आहेत.
पिकलेल्या फणसाच्या बी वर आता विविध पातळ्यावर संशोधन सुरू आहे. त्यामध्ये कोणते घटक आहेत, याबाबतीत चिकित्सा केली जात आहे; परंतु पुर्वीपासून बी चा वापर आहारात केला जातो. कच्च्या गऱ्याची भाजीत बी असते; पण पिकलेल्या फणसाची बी काढून ती योग्य पध्दतीने वाळवून ठेवली जाते. या बी चा वापर पावसाळ्यात वेगवेगळ्या पध्दतीने केला जातो.
बी टिकून राहावी याकरीता त्याला चिखलमातीचा लेप देवून ती सुकविली जाते. जेणेकरून तिला बुरशीजन्य किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊ नये. वटपौर्णीमेला फणसाला मोठी मागणी असते. कोकणातील प्रत्येक गावात ट्रक, टेम्पो भरून फणस मुंबई, पुणे, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर यासह विविध शहरात नेले जातात. या कालावधीत कापा फणसाला चांगला दर मिळतो. प्रति नग ३०० ते ४०० रूपये दराने विक्री होते.
बदलत्या वातावरणामुळे प्रत्येक फळावर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मोहोराचे संरक्षण करण्यापासून ते फळ परिपक्व होईपर्यत शेतकऱ्याला विविध किटकनाशक, बुरशीनाशकासह विविध फवारण्या घ्याव्याच लागतात; मात्र कोकणातील फणस हे एकमेव फळ आहे, त्याला कसलाच प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे त्या झाडाला कुणीही शेणखत घालत नाही किंवा किटकनाशकाच्या फवारण्या कराव्या लागत नाही. त्यामुळे हे एकमेव फळ विषमुक्त आहे.
चौकट
अनेक रूपे
फणसामध्ये कापा आणि रसाळ (बरका) असे दोन प्रकार असतात. कापा फणस पिकल्यानंतर जास्त दिवस टिकून राहतो. मात्र, रसाळ फणस एक दोन दिवसच टिकतो. त्यामुळे कापा फणसाला अधिक पसंती लोक देतात. दुरवर पाठवायचा झाल्यास कापा फणसच पाठविला जातो. वरकरणी हे दोन प्रकार असले तरी फणसाची अनेक रूपे कोकणात पाहायला मिळतात. काही फणसाचे गरे लहान असतात, काहींचे मध्यम तर काहींचे एकदम मोठे असतात. प्रत्येक झाडाच्या फणसाची चवीत थोडाफार दिसून येतो. काही झाडांचा हंगाम जानेवारीपासून सुरू होतो तर काही झाडांचा हंगाम हा एप्रिलपासून सुरू होतो.
चौकट
विविध उत्पादने
कोवळ्या फणसांची भाजी (रेडी टु इट'')
तयार झालेल्या गऱ्यांची भाजी (रेडी टु इट'')
उकडलेल्या आठळ्या (रेडी टु इट'')
वेफर्स
तळलेले गरे
फणस पोळी,
फणस मोदक
जॅम
कोट
बारा-तेरा वर्षापूर्वी आम्ही एक स्वप्न पाहीले होते. ते स्वप्न आता सत्यात उतरत आहे. फळ, अन्न, नुट्रीशियन, ॲन्टीडायबेटीक अशा फणसाला चांगली किंमत मिळायला हवी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी विदर्भात फणसाला प्रतिकिलो ३५ रूपये दर मिळाला. यापुढील काळात फणसाला खरोखरच चांगले दिवस असणार आहेत.
- मिथीलेश देसाई, फणसकिंग तथा उत्पादक, लांजा
कोट
गेल्या अनेक वर्षापासून आम्ही फणसांवर प्रकिया करीत आहोत. २००१ मध्ये फणस पल्प तयार करण्यात यश आले. त्यामुळे आता बारमाही फणसांची उत्पादने ग्राहकांना आम्ही पुरवित आहोत.
- नारायण गावडे, प्रकिया उद्योजक, डेगवे, सावंतवाडी,
कोट
आम्ही वर्षानुवर्षापासून असलेल्या फणसांच्या झाडांचे जतन, संवर्धन केले आहेच; परंतु नव्याने स्थानिक जातीच्या फणसांची लागवड केली आहे. सध्या माझ्याकडे १०० झाडे असून ५० झाडे उत्पादनक्षम आहेत.
- सदाशिव भिडे, फणस उत्पादक, झोळंबे, दोडामार्ग
दृष्टिक्षेपात....
* फणसांमध्ये व्हीटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोहचा समावेश
* शरीरातील साखर संतुलित ठेवण्यासाठी उपयोग
* डोळ्यांची दृष्टी वाढते, वजन कमी होते
* अॅनेमियापासून बचाव
* फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचन आणि चयापचय सुधारण्यात मदत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.