महिलेचा छळ ;
पतीसह तिघांवर गुन्हा
रत्नागिरी ः पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह कुटुंबातील तीनजणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१६ ते २६ जून २०२५ या कालावधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा २०१६ ते २३ जून २०२५ या मुदतीत संशयित यांनी तू माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी केली. ३ मुली झाल्या या कारणाचा राग मनात धरून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. पतीने तीनवेळा तलाक बोलून नाते संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच राजापूर न्यायालयात त्यांच्याविरुद्ध केलेली केस मागे घेण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला गेल्याची तक्रार संबधित महिलेने पोलिसात दिली.
बिहारमधील तरुणाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः दुकानात असताना अचानक चक्कर आलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मोहम्मद इम्तियाज मोहम्मद जाकिर आलम (वय २५, रा. सोनमा सोनबाणू, जिल्हा बेगुसराई राज्य बिहार) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) सकाळी खेडशी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहम्मद आलम याला पंधरा दिवसापूर्वीपासून ताप येत असल्याने ते कोकणनगर येथील दवाखान्यात गेले होते. तेथे त्यांना बरे वाटत नसल्याने मूळ गावी बिहार येथे जाणार होते म्हणून भाड्याची खोली खाली करून दिली होती. १ जुलैला तो सर्विस सेंटर येथे राहण्यास गेला असताना बुधवारी सकाळी गप्पा मारत असताना त्याला अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.