कोकण

उदासिनता

CD

शिधाधारकांमध्ये ‘ई-केवायसी’बाबत उदासिनता
चिपळूण तालुक्यातील चित्र ; २० टक्के लाभार्थी परगावी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः शिधापत्रिका ई केवायसी करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही चिपळूण तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांकडून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात उदासीनता दाखवण्यात येत आहे. यात सर्वाधिक प्रमाण नोकरी करण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेलेल्या चाकरमानी कुटुंबीयांचे आहे.
ई-केवायसी करण्यासाठी ३० जूनची मुदत देण्यात आली होती. यादरम्यान ई-केवायसी न झाल्यास शिधापुरवठा बंद होऊ शकतो, अशा सूचना जिल्हा पुरवठा विभागाने दिल्या होत्या. तरीही तालुक्यात आतापर्यंत फक्त ८९.५३ टक्केच ई-केवायसी पूर्ण झाली आहे. अद्याप तालुक्यात सुमारे २०.४७ टक्के शिधापत्रिकांची ई-केवायसी होणे बाकी आहे. यापूर्वी वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली. या मुदतीत लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार क्रमांक देऊन ई-केवायसी करावी. असे आवाहन करण्यात आले. ई-केवायसी करण्यासाठी आतापर्यंत अनेकदा शिबिरांचे आयोजन केले आहे. शिधा वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी शिधापत्रिका ई-केवायसीद्वारे आधार कार्ड संलग्न करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. तालुक्यातील बहुतांश नागरिक नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित झाले आहेत. काही जणांकडून गावाकडे येऊन ई-केवायसी करण्यास वेळ मिळत नसल्याचे सांगण्यात येते.
---------
कोट
शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करून ई-केवायसी करणे गरजेचे आहे. यातून शिधापुरवठा करण्यात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पुरवठा विभागाकडून वारंवार शिबिरे आयोजित करण्यात आली होती, परंतु काही गावामधून यास कमी प्रतिसाद मिळत आहे.
--प्रवीण लोकरे तहसीलदार चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

Panchang 18 March 2026: आजच्या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! इराक-इराण युद्धाची सोलापूरकरांना झळ; सोलापूर शहरात रिक्षा चालकांनी वाढविले १० ते १५ रुपये भाडे; कोणत्या मार्गावर किती भाडे? वाचा...

आजचे राशिभविष्य - 18 मार्च 2026

अग्रलेख : धर्मस्वातंत्र्याचे तारतम्य

SCROLL FOR NEXT