77253
मालवणात माजी विद्यार्थ्यांतर्फे गुरुवंदना
मालवण : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक व त्यांचे कुटुंबीय यांच्या समवेत ओझर विद्यामंदिरचे निवृत्त शिक्षक (कै.) केळकर यांच्या मालवण धुरीवाडा येथील निवासस्थानी गुरुवंदना कार्यक्रम साजरा करण्यात आला. माजी विद्यार्थी व संघटक उमेश कोदे यांनी केळकर यांच्या शैक्षणिक कार्याची महती कथन करणारा ‘गुरुवर हृद्येश्वर तू खरा’ हा लेख ओझरचे पहिल्या तुकडीचे माजी विद्यार्थी सुधाकर राणे (कांदळगाव) यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत निवृत्त शिक्षिका मीना केळकर यांना दिला. ओझरचे मुख्याध्यापक श्री. जाधव, आर. पी. बागवे हायस्कूल मसुरेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोदे, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, शिक्षक पी. के. राणे, प्रवीण पारकर, विजय नातू, माजी शिक्षिका उषा मुरवणे, विजय कांबळी, मंगल वझे, ऋतुजा केळकर आदींनी केळकर यांच्या शिकवणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जयसिंग जाधव, नंदकुमार पाटील, लक्ष्मण परब, सुधीर सुर्वे, मधुसूदन परुळेकर, गणेश सातार्डेकर, सत्यवान परब, विराणी कोदे-सातार्डेकर आदी उपस्थित होते. लेखाचे अभिवाचन ऋतुजा केळकर यांनी केले. प्रवीण पारकर यांनी आभार मानले.
---------
77252
मालवणात ‘धक्का’तर्फे गणवेश वाटप
मालवण : सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करणाऱ्या मालवणमधील धक्का मित्रमंडळ या ग्रुपच्या वतीने शहरातील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल व कन्याशाळा या शाळांमधील गरजू मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. फातिमा कॉन्व्हेंटमधील मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी वस्तू देण्यात आल्या. यावेळी धक्का मित्रमंडळाचे सदस्य शंकर पाटकर, संजय गावडे, बाबू डायस, हेमंत शिरगावकर, देवा तोडणकर, नीतेश जाधव, नितीन कोटियान, डॉ. धनंजय सावंत, प्रतीक कुबल, केशव साठे, शर्मिला गावकर, प्रशांत हिरणवाळे यांच्यासह कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका साटलकर व इतर शिक्षक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.