
घटस्फोट मिळताच तरुणाने चक्क दुधाने अंघोळ करत आनंद साजरा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसामच्या नलबाडी जिल्ह्यातील एका तरुणाने पत्नीपासून कायदेशीररित्या वेगळे झाल्याचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. माणिक अली असं या तरुणाचं नाव असून, त्याने दुधाने अंघोळ करत आपला आनंद व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत माणिक म्हणताना दिसतो, आजपासून मी स्वतंत्र आहे. मात्र त्याच्या आनंद साजरा करण्याच्या पद्धतीवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.