
नवी दिल्ली : भारतात मिठाचे जास्त प्रमाणात सेवन हे एक अदृश्य महासाथीचे मुख्य कारण बनत आहे, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय साथरोगनिदान संस्थेच्या (एनआयई) शास्त्रज्ञांनी दिला आहे. जास्त मीठ खाल्ल्यामुळे लोकांमध्ये उच्च रक्तदाब, लकवा, हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या विकारांचा धोका वाढतो आहे.