कोकण

ओझरम शाळेस साहित्य भेट

CD

78285

ओझरम शाळेस साहित्य भेट
तळेरे, ता. १८ ः राष्ट्रीयकरण बँक दिनाचे औचित्य साधत एसबीएच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टतर्फे ओझरम जिल्हा परिषद शाळेला पूर्ण वर्गासाठी लागणाऱ्या बेंचचे हस्तांतरण माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांना स्टील लॉकर्सही दिले. यावेळी श्री देसाई यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक कामांचे कौतुक करताना, सिंधुदुर्ग जिल्हा व बहुतांशी कणकवली तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात एसबीएच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्ट करीत असलेल्या भरीव मदतीबद्दल सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांतर्फे आभार मानले. मुख्याध्यापक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी एसबीएच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टचे बी. एस. सावंत, कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस व त्यांचे सहकारी तसेच समाजसेवक कासार्डे माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत, ओझरमच्या सरपंच सौ. राणे, गावातील प्रतिष्ठित मंडळी समन्वयक जितेंद्र राणे उपस्थित होते.
------
78284

बॅ. नाथ पै विद्यालयाचे शिष्यवृत्तीत यश
कुडाळ, ता. १८ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बॅ. नाथ पै विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्ती विभागातून पाचवीमधून सान्वी गावडे जिल्ह्यात पाचवी, नैतिक मर्गज जिल्ह्यात ४५ वा आला.
आठवी शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्ती विभागातून कार्तिकी वजराटकर जिल्ह्यात चौथी, वैदेही पाताडे जिल्ह्यात सातवी, सोम वारंग जिल्ह्यात २४ वा आला. शाळा समिती उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी मुख्याध्यापक प्रेमदास राठोड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT