देवरूखमध्ये
प्रशिक्षण केंद्र
साडवली ः जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी विभागामार्फत देवरूख येथे मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन २७ जुलैला दुपारी २ वाजता होणार आहे. त्यासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समन्वयक संदीप पाटील यांनी दिली. देवरूख येथे मोफत सुविधा सुरू केल्याने ग्रामीण भागातील मुला-मुलींचे शिक्षण व उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. देवरूखसाठी रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मैदान तसेच वाचनालयाची सोय केली आहे. तज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक केली जाणार आहे.
-------
नवीन संचमान्यतेचा
निर्णय रद्द करा
रत्नागिरी ः १५ मार्च २०२४ रोजी लागू करण्यात आलेल्या नवीन संचमान्यतेच्या निर्णयासंदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षकसंघाने आमदार शेखर निकम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसेच संचमान्यतेचा विषय विधानसभेत उठवल्याबद्दल आभार मानले. या संचमान्यतेचा शासननिर्णय रद्द करणे, मुख्यालयी राहण्याचा शासनआदेश रद्द करणे, शिक्षणसेवक पद रद्द करून नवनियुक्त शिक्षणसेवकांना नियमित शिक्षक करणे, शिक्षकांना मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करून देणे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे, आदर्श शिक्षकांना एक वेतनवाढ लागू करून देणे, केंद्रीय प्रमुखांना पदोन्नती देणे, शिक्षकांना क्युआर कोड असलेले डिजिटल कार्ड उपलब्ध करून देणे आदी मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश सावर्डेकर, संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रवीण सावंत, सदस्य आनंद देशपांडे, मनोज घाग, सय्यद आदम, अजय उपरे, अरविंद पवार, रवींद्र शिवडे, अजित कांबळे आदी शिक्षक उपस्थित होते.
-----
विद्यार्थ्यांनी घेतला
लावणीचा अनुभव
संगमेश्वर ः शालेय शिक्षण घेताना पुस्तकाप्रमाणे विद्यार्थ्यांना कौशल्यांची आवड निर्माण व्हावी यासाठी तुरळ गुरववाडी येथे भात लावणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. शाळेजवळीच असलेल्या शंकर लिंगायत यांच्या शेतजमिनीमध्ये भात लावणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. रोपे, चिखलणी, लावणीबाबत दिलीप काजवे यांनी सविस्तर माहिती दिली तसेच शेतीकडे पुन्हा आपण वळले पाहिजे, असे आवाहन केले. या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती, सेवाभाती कोकण प्रांत ट्रस्ट फिरती विज्ञानप्रयोग शाळा तसेच शिक्षक यांनी सहकार्य केले. या वेळी शंकर लिंगायत, मुख्याध्यापक मधुकर गडदे, हरिश्चंद्र नांदिवडेकर, सुवार्ता गवळी, वैष्णवी खर्डे, सुप्रिया सुतार, वैशाली सुतार, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.