कोकण

श्री देव तृणबिंदेकश्वरावर संततधार

CD

-rat२३p३३.jpg-
२५N७९४८०
रत्नागिरी : श्री देव तृणबिंदुकेश्वर संततधारप्रसंगी पिंडीला फळे, फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते.
------------
श्री देव तृणबिंदुकेश्वरावर संततधार
आजपासून प्रारंभ ; विविध धार्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदुकेश्वर ट्रस्टतर्फे श्रावण महिन्यात श्री देव तृणबिंदुकेश्वरावर सालाबादप्रमाणे अखंड संततधार (रूद्रानुष्ठान) आयोजित केली आहे. याचा प्रारंभ शुक्रवारी (ता. २५) सकाळी ९ वाजता होणार आहे. दररोज रात्री ९ वाजता आरती होणार आहे.
दर सोमवारी सायंकाळी ६ वाजता आरती होणार आहे. २८ जुलैला सायंकाळी ४ वाजता प्रवीण मुळ्ये यांचे कीर्तन होणार आहे. संततधारेची सांगता २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. संततधार अनुष्ठानात, दिवस-रात्र रूद्रमंत्रांचे पठण केले जाते ज्यामुळे वातावरणात शांतता आणि सकारात्मकता पसरते. अनेक भाविक या अनुष्ठानात सहभागी होऊन तृणबिंदूकेश्वराचे दर्शन घेतात आणि तीर्थप्राशन करतात, ज्यामुळे त्यांची संकटे दूर होतात असे मानले जाते.
तृणबिंदुकेश्वराच्या पिंडीवर तांब्याच्या अभिषेक पात्रामधून पाण्याची संततधार संपूर्ण श्रावण महिन्यात दिवस-रात्री अखंडपणे सुरू असते. या वेळी गाभाऱ्यात ब्रह्मवृंद रुद्र पठण करत असतात. तृणबिंदुकेश्वराची स्थापना करणाऱ्या मुळे नामक व्यक्तीच्या वंशजांनी ही संततधार परंपरा सुरू केली ती आजतागायत सुरू आहे. संततधार रूद्रानुष्ठानाच्या कालावधीत दररोज बेल, विविध प्रकारची फुले, फळांची आरास केली जाते. संततधारेकरिता भाविक, दानशूर मंडळींचे सहकार्य लाभते.
संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत. ८ ऑगस्टला रात्री ९ वाजता पौती पौर्णिमा, १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी, रात्री १२ वाजता पवमान व आरती होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telesurgery India : नागपूरच्या डॉक्टरांची कमाल! 1 हजार किलोमीटर दूरच्या 2 रुग्णांवर केली रोबोटिक टेलीसर्जरी; भारतातला पहिलाचा प्रयोग

Biotin Rich Foods For Hair Growth: केस गळणे थांबतच नाहीये? आहारात 'या' 5 गोष्टी समाविष्ट करा; लगेत दिसेल फरक!

Khutbav News : पंढरीच्या वारीमध्ये हरवलेले भगत आजोबा एक महिन्याने घरी परतले; गायकवाड यांच्या रूपात पंढरीचा पांडुरंग भेटल्याची भगत परिवाराची भावना

Latest Maharashtra News Updates : फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवततात, अशी चर्चा सुरुय - रोहित पवार

Local Megablock: मुंबईकरांना करावा लागणार गर्दीचा सामना, मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT