कोकण

न्हावेली येथे गव्यांकडून काजू कलमांचे नुकसान

CD

80119

न्हावेली येथे गव्यांकडून
काजू कलमांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः न्हावेली गावात गव्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून, येथील बागायतदार शेतकरी शशिकांत रघुनाथ परब यांच्या बागेतील काजू कलमांचे नासधूस करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी वनविभागाशी संपर्क केला असता वनविभागाची टीम तत्काळ दाखल होऊन नुकसानाची पाहणी केली. यावेळी वनपाल पृथ्वीराज प्रताप यांनी आपल्या टीमसह नुकसानग्रस्त शेतकरी श्री. परब यांच्याकडून माहिती घेत भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये शिरकाव करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच, यामुळे परिसरातील शेती, बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गव्यांच्या वारंवार होणाऱ्या उपद्रवाला गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले असून, जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर वनविभागाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून वारंवार केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT