कोकण

चिपळूण - 11 कोटी खर्चूनही कुंभार्ली घाटाची दुरवस्थाच

CD

rat२९p१३.jpg
८०७१०
चिपळूण : कुंभार्ली घाटरस्त्याची झालेली दुरवस्था.

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चूनही दुरवस्थाच
मनसेने विचारला जाब; सार्वजनिक बांधकाम खाते करते काय?
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ः कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षात ११ कोटी रुपये खर्च झाले. तरीही घाटरस्त्याची दुरवस्था आहे मग हा निधी गेला कुठे, असा सवाल मनसेच्या वाहतूक शाखेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे. निकृष्ट कामाप्रकरणी शाखा अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली नाही तर गाठ माझ्याशी आहे. मी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार, असा इशाराही त्यांनी कार्यकारी अभियंता यांना दिला.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सती ते कुंभार्ली घाटरस्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते; मात्र, कुंभार्ली घाटासह सती खेर्डीपर्यंत रस्ता खड्ड्यांनी भरला गेला आहे. या खड्ड्याची मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले आणि कार्यकर्त्यांनी खड्ड्याची पूजा करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावाने टाहो फोडला तर सोमवारी या संदर्भात जाब विचारण्यासाठी मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले, रिक्षा संघटनेचे दिलीप खेतले, सदानंद गोंधळी, सरफराज हमदुले, गजानन राक्षे, दीपक मोहिते, राकेश शेट्टे, मुराद हैसनी, निजाम सुर्वे, अकबर शिरलकर, नरेश कदम आदी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडकले.
मिरजोळी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तेथील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले तरीही रस्ता दुरुस्त होत नाही मग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदाराकडून कोणत्या पद्धतीने काम करून घेतात, असा प्रश्न निर्माण होतो असे खेतले यांनी सांगितले.

चौकट
कामे दर्जेदार का झाली नाहीत?
या वेळी रस्त्यावर ११ कोटी रुपये दोन वर्षात खर्च केलेत तर मग रस्त्याची अशी अवस्था का? २०१७ पासून या रस्त्यावर ३७ कोटी रुपये खर्च केलेत. मग हा पैसा कुठे गेला? सतत या रस्त्यावर निधी खर्च होत असताना कामे दर्जेदार का झाली नाहीत? असा सवाल राजू खेतले यांनी विचारला.

कोट
कुंभार्ली घाटरस्त्यात प्रचंड खड्डे पडले आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी मी सार्वजनिक बांधकाम विभागाला ८ दिवसाची मुदत दिली आहे. आठ दिवसात खड्डे भरले गेले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला मी काळे फासणार आहे, याची सूचना मी त्यांना दिली आहे.
- राजेंद्र खेतले, जिल्हाध्यक्ष मनसे वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction on Trump tariff: ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर फोडलेल्या टॅरिफ बॉम्बनंतर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका!

Jaya Bachchan warn Priyanka Chaturvedi: जया बच्चन राज्यसभेत बोलताना अचानक शेजारीच बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींवर उखडल्या, म्हणाल्या...

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Prakash Solanke: प्रकाश सोळंकेंनी गळाला लावलेले बाबरी मुंडे नेमके कोण? पंकजांसह धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT