
Jaya Bachchan’s Angry Reaction in Rajya Sabha: राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेताना, खासदार जया बच्चन यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ऑपरेशन सिंदूरच्या नावावरून प्रश्न उपस्थित करत त्या म्हणाल्या, कितीतरी महिलांचे सिंदूर उद्ध्वस्त झालेले असताना, या ऑपरेशनला हेच नाव का देण्यात आलं?. या हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांचे कुटुंब तुम्हाला माफ करणार नाही, कारण त्यांची माफी मागितली गेली नाही.
यावेळी सभागृहात गदारोळ सुरू झाला, तेव्हा सभागृहातील गोंधळावर नाराजी व्यक्त करत असतानाच, जया बच्चन यांनी त्यांच्या शेजारीच बसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनाही सुनावलं. यानंतर सभागृहातील सदस्यही या कृतीवर हासल्याचे समोर आलं.
त्याचं घडलं असं की, ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान जया बच्चन बोलत असताना इतर सदस्यांनी त्यांची नाराजी व्यक्त करत आवाज करायला सुरुवात केली. तर, जया बच्चन यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, तुम्ही असे लेखक ठेवले आहेत जे मोठी मोठी नावे देतात! हे नाव सिंदूर का ठेवले गेले? मारले गेलेल्यांपैकी ज्यांच्या पत्नी मागे राहिल्या आहेत, त्यांचे सिंदूर तर मिटले आहेत.
यावर काही सदस्य गदारोल करू लागले. यानंतर जया बच्चन म्हणाल्या की, एकतर तुम्ही बोला नाहीतर मी बोलेन. यावर जेव्हा दुसऱ्या बाजूच्या सदस्यांनी आवाज उठवला तेव्हा जया बच्चन पुढे म्हणाल्या की जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा मी तुम्हाला थांबवत नव्हते. आता मी बोलत आहे, म्हणून माझ्या वेळेत मला थांबवू नका.
तर इतर सदस्यांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर, जया बच्चन यांनी जवळ बसलेल्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनाही सुनावलं. त्यांनी म्हटले की, प्रियंका, मला नियंत्रित करू नका. जया बच्चन यांनी प्रियंका चतुर्वेदींना असं हे सांगताच त्याही क्षणभर अस्वस्थ झाल्या आणि नंतर हसत हसत चेहरा लपवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.