प्रवाशाचा मोबाईल
चोरट्याने पळवला
रत्नागिरीः कोकण रेल्वेच्या मारूसागर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोरट्याने पळवला. शहर पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास मारूसागर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजश्री व्ही. पी. एम. श्रीधरण (वय ३५, रा. आयएमडी निवासी वसाहत, विमानतळ, भुवनेश्वर, राज्य ओरिसा) हे रविवारी (ता. २७) कोजीकोडे रेल्वेस्टेशन-केरळ येथून पनवेल रेल्वेस्टेशन येथे येणारी मारूसागर सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशनदरम्यान त्यांना झोप लागली. या संधीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांचा सीटवर ठेवलेला १५ हजाराचा मोबाईल पळवला.
----------
तणनाशक पिलेल्या
तरुणीचा मृत्यू
रत्नागिरीः तणनाशक विषारी औषध पिलेल्या तरुणीला उलट्या झाल्या. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी अस्टर आधार रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. प्रणाली प्रकाश गार्डी (वय २६, रा. वेळवण, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास अस्टर आधार रुग्णालय कोल्हापूर येथे घडली. दीपाली देवेंद्र घाटकर (वय २९, रा. कुवारबाव-रत्नागिरी) यांची बहीण मयत प्रणाली गार्डी तिच्या आईसह प्रणालीच्या लग्नाविषयी चर्चा करण्यासाठी शनिवारी कुवारबाव येथे राहावयास आल्या होत्या. शुक्रवारी (ता. १८) सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रणाली हिने तणनाशक प्यायले. तिला उलट्या होऊ लागल्या. तत्काळ नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी अस्टर आधार रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.
..........
वकील असल्याचे भासवून
४५ हजाराची फसवणूक
रत्नागिरीः वकील असल्याचे भासवून ४५ हजार ११० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जीवन गणपत जाधव (वय ५५, रा. नाखरे, भगवतीवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २३ जून ते १७ जुलै या कालावधीत आसगे (ता. लांजा) येथे घडली होती. फिर्यादी बाबाजी बुधाजी कोलापटे (वय ६२, रा. आसगे मांडवकरवाडी, ता. लांजा, रत्नागिरी) यांना संशयित जीवन जाधव यांने आपण वकील असल्याचे सांगून त्यांना विश्वासात घेऊन फिर्यादी यांची मोटार भाड्याने घेतली. भाड्यापोटी ३७ हजार दिले नाहीत. फिर्यादी कोलापटे यांना जेल कॅन्टिंगचे काम देतो, असे सांगून त्यांचा ५ हजाराचा मोबाईल घेतला तसेच संशयिताने नातीच्या शांतीचे कारण सांगून फिर्यादी यांच्याकडून १ हजार ११० रुपये किमतीचे ३६ नारळ घेतले, अशी ४५ हजार ११० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी बाबाजी कोलापटे यांनी लांजा पोलिसात तक्रार दिली.
---
दारू विकणाऱ्या
महिलेविरुद्ध गुन्हा
पावसः तालुक्यातील कोळंबे येथे विनापरवाना हातभट्टीच्या दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४१० रुपयांची चार लिटर दारू जप्त केली. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोळंबे-बागवाडी येथील संशयित महिलेच्या राहत्या घराच्या मागील बाजूस आंब्याच्या झाडाखाली निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित महिला विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करत असताना सापडली. या प्रकरणी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रद्धा करळकर यांनी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात तक्रार दिली.
------------
विष प्यायलेल्या
वृद्ध महिलेचा मृत्यू
पावस ः विषारी औषध प्यायलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सुनीता चंद्रकांत जाधव (वय ७०, रा. नाखरे-भगवतीवाडी, रत्नागिरी) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजता सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला सुनीता यांनी घरी असताना कोणत्यातरी कारणातून विष प्राशन केले. तत्काळ त्यांचा मुलगा प्रसाद यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.
---
नशेत विष पिलेल्या
नेपाळीचा मृत्यू
रत्नागिरी ः मद्याच्या नशेत विष प्यायलेल्या नेपाळी प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मनोज थापा (वय ४५, रा. गोळप, रत्नागिरी. मुळ ःनेपाळ ) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. २४) दुपारी घडली होती. थापा याने मद्याच्या नशेत विष पिले. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २९) सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.