कोकण

सहा जिल्ह्यातील 4700 वकीलांना लाभ

CD

सहा जिल्ह्यातील ४७०० वकीलांना लाभ
अॅड. विलास पाटणेः उच्च न्यायालयाचे सर्कीट बेंच कोल्हापूरला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ः कोल्हापूर येथे मंजूर झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचमुळे न्यायव्यवस्थेचा परिघ विस्तारत गेला आहे. सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील ४७०० वकील, ६२ हजार खटले, त्यातील ५०० ते ६०० किलोमिटर परिसरातील हजारो पक्षकारांना याचा उपयोग होणार आहे. या बेंचच्या निर्णयामुळे शासन व्यवस्थेच्या यंत्रणेचा भार कमी होईल, असे रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचसंदर्भात अॅड. पाटणे म्हणाले, चाळीस वर्षाच्या लढ्याला अखेर यश आले आहे. याचे प्रत्यक्ष कामकाज १८ ऑगस्टपासून जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सुरु होणार आहे. १९३१ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापुरात उच्च आणि सर्वोच्च न्यायालय स्थापन केले होते. कोल्हापूर गॅझेट व कोल्हापूर लॉ रिपोर्टमध्ये त्याचे संदर्भ सापडतात. त्यापूर्वी १८६७ मध्ये जिल्हा न्यायालय स्थापन झाले होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे कोल्हापूरचे पहिले जिल्हा न्यायाधिश झाले. केंद्रीय कायदामंत्र्याच्या लोकसभेतील उत्तराप्रमाणे देशात आज ५ कोटी खटले प्रलंबित आहेत. त्यातील १ लाख ८० हजार खटले ३० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. प्रलंबित खटल्यांचा बॅकलॉगचा निपटारा करण्याकरीता ३२४ वर्ष लागतील असा निती आयोगाचा अहवाल आहे. त्यानुसार नुकतेच मंजूर झालेले कोल्हापूर येथील खंडपिठ रत्नागिरी, सिधुंदुर्ग, साताऱ्यापासून १५० कि.मी. अंतरावर तर सोलापूर सर्वसाधारणपणे २३५ कि.मी. अंतरावर राहील. पोलीस व महसूल यंत्रणेवरील भार कमी झाल्यामुळे खर्च कमी होईल. न्यायालयीन व्यवस्थेत सुटसुटीतपणा तसेच न्याय साधा, जलद, स्वस्त, प्रभावी व टिकावू होण्याकरीता आणि न्यायव्यवस्था सामान्य पक्षकारांच्या दारापर्यंत जाण्याकरीता कोल्हापूर खंडपिठाची प्रकर्षाने गरज होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रवाशांची होणार कोंडी! रेल्वेनंतर वाहतूक विभागाचा ब्लॉक; खड्डे समस्यांसाठी 'या' मार्गावर ३ दिवस प्रवेश बंद

Elephant Relocation Controversy : कोल्हापूर झालं आता गडचिरोलीचा नंबर? 'माधुरी'नंतर कमलापूर कॅम्पमधील हत्तींबाबत चिंतेचं वातावरण...

ENG vs IND: 'वॉन आणि माझ्यात ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या बातम्या निराधार...' कसोटी मालिकेनंतर वासिम जाफरची पोस्ट चर्चेत

Latest Maharashtra News Updates Live : जिल्हा परिषदेच्या चार हजार ८० जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT