कोकण

चर्मवाद्य तयार करण्याची दीडशे वर्षांची परंपरा

CD

चर्मवाद्य तयार करण्याची परंपरा
दिलीप लिंगायत ः १८७६ च्या आधीपासून सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ः लोवले येथील दिलीप लिंगायत हे नावडी येथे पोस्टगल्ली रोड येथे गेली अनेक वर्ष वाद्य साहित्य दुकानात चर्मवाद्य तयार करून देत आहेत. त्यांच्या या व्यवसायाला अनेक वर्षांची परंपरा आहे. १८७६ च्या आधीपासून कै. गणलिंग लिंगायत कसबा यांनी या व्यवसायास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे वंशज कै. भाऊलिंग गणलिंग लिंगायत १९५५ पर्यंत देवीचे मृदुंग भरणे हे काम करत असत.
१९६० च्या काळात कै. सदाशिव भाऊलिंग लिंगायत यांनी नावडी येथील बाजारपेठेत आपले दुकान थाटले. काही वर्ष त्यांचे दुकान गणपती मंदिर गणेशआळी येथे होते. मुचरी, फुणगूस, खाडीपट्टा नायरी इतक्या लांबून लोकं ढोलकी, नाल, तबला, डग्गा भरण्यासाठी येत असतात. गेली अनेक वर्षे त्यांनी हा व्यवसाय सांभाळला. सध्या हा व्यवसाय कै. सदाशिव लिंगायत यांची मुले दिलीप व प्रकाश लिंगायत हे सांभाळत आहेत. या व्यवसायात मुले शिवम व अजिंक्य सध्याच्या काळात मदत करतात. नावडीमधील पोस्टआळी येथील प्रकाश सदाशिव लिंगायत यांच्या दुकानात नाल, पखवाज, तबला, ढोलकी, डग्गा, मृदुंग, ढोलक, ताशा, डफली इ. चर्मवाद्य भरून घेण्यासाठी तालुक्यातील विविध गावांतून सध्या गोकुळाष्टमी, अखंड हरिनाम सप्ताह तसेच गौरी-गणपती सण व उत्सव हे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत असल्यामुळे ग्राहकांची दिलीप लिंगायत यांच्या दुकानात या कामासाठी गर्दी झालेली दिसून येते. बदलत्या काळातही १५० वर्षांची कलेची परंपरा दिलीप लिंगायत यांनी जपली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: टीकाकारांना खणखणीत उत्तर! शुभमन गिल होणार एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार? रोहित शर्मा किती काळ खेळेल?

Latest Marathi News Updates : सहकार बोर्ड अध्यक्षपदी संजय मंडलिक, उपाध्यक्षपदी अमित देसाई यांची बिनविरोध निवड

Mahadevi Kolhapur Return : महादेवीची घरवापसी लांबणार, कायदेशीर प्रक्रियेने कोल्हापुरकरांच्या चळवळीला यश येणार का?

Ganesh Festival Pune 2025 : विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने तोडगा काढू, पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक; मानाच्या मंडळांकडून निर्णय जाहीर

Besan Tomato Paratha: सकाळच्या नाश्त्यात 20 मिनिटांत बनवा रुचकर बेसन टोमॅटो पराठा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT