
Mahadevi Return To Kolhapur : महादेवीला पुन्हा नांदणी मठाच्या स्वाधीन करावे, यासाठी सर्व पक्ष आणि सर्व धर्मीयांतर्फे आंदोलने होत आहेत. नांदणी-कोल्हापूर पदयात्रेने शासनाला जाग आणली. मुंबईतील बैठकीत सरकार आणि मठातर्फे फेरविचार याचिका दाखल करण्याचे ठरले; मात्र या कायदेशीर प्रक्रियेत महादेवीची घरवापसी काही दिवस लांबण्याची चिन्हे आहेत.
हत्ती अनुसूचित - एक म्हणजेच डोंगरी व कॅप्टीव्ह एलिफंट (पाळीव हत्ती) या दोन प्रकारांत मोडतात. पाळीव हत्तीबाबत राज्य सरकारने विशेष कायदा करणे आवश्यक आहे. तरच अशा अपवादात्मक प्रसंगात धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.