फाटक हायस्कूलमधून १३१ सैनिकांसाठी राख्या
रत्नागिरी : एक राखी सैनिकांसाठी उपक्रमांतर्गत फाटक हायस्कूल आणि श्रीमान वि. स. गांगण कला वाणिज्य व (कै.) त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अरुणाचल प्रदेशमधील १४ मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटच्या सैनिकांसाठी १३१ राख्या पाठवल्या. शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सैनिकांप्रती आदरभाव निर्माण व्हावा, त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राखी पाठवावी, या संकल्पनेतून सुरू झालेल्या उपक्रमांतर्गत गेली सहा वर्षे विद्यार्थिनींकडून सैनिकांसाठी राख्या पाठवल्या जातात. बारावीच्या पाठ्यपुस्तकातील अनुराधा प्रभुदेसाई यांच्या वीरांना सलामी या पाठातून प्रेरणा घेऊन यावर्षी अरुणाचल प्रदेशमधील सैनिकांसाठी राख्या आणि शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. खाऊच्या पैशातून राखी खरेदी करून सैनिकांसाठी राख्या पाठवण्याच्या उपक्रमातून देशभक्तीचा मूल्यसंस्कार रूजवण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला. या उपक्रमासाठी नववी ते बारावीच्या शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापक राजन कीर यांचे विशेष सहकार्य लाभले.
माहेर संस्थेत वक्तृत्व स्पर्धा
रत्नागिरी ः माहेर संस्थेत बालकांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त याचे आयोजन केले होते. लहान गटात प्रथम जोया शेख, द्वितीय हर्षिता दळवी, तृतीय शिवम दळवी; मोठ्या गटात प्रथम चैतन्य पवार, द्वितीय मयुरी हिवराळे, तृतीय वैष्णवी चव्हाण या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये यश मिळवले. विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे प्रकल्पप्रमुख सुनील कांबळे व अधीक्षिका शीतल हिवराळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. आभार मुस्कान शेख हिने मानले.
लोटे रोटरॅक्ट तर्फे गरजूंना धान्याचे वाटप
चिपळूण ः खेड तालुक्यातील लोटे येथील रोटरॅक्ट क्लब आणि रितिक चंद्रा यांच्यावतीने लोटे गावातील गरजू ज्येष्ठ नागरिकांना २ महिना पुरेल इतके धान्याचे कीट आणि छत्रीवाटप करण्यात आले. समाजातील गरजू आणि आर्थिक मागास असलेल्या घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. सातत्याने या पद्धतीने क्लबतर्फे असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. या वेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ लोटेचे अध्यक्ष शुभम काते, अनिकेत काते, माजी अध्यक्ष मनीष वाडकर, सदस्य अजिंक्य रोकडे व विक्रम पवार यांच्यासह क्लबचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाद्वारे गावातील अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला असून, उपस्थितांनी क्लबच्या या कार्याचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.