कोकण

विद्यार्थ्यांनी जवानांना पाठवल्या राख्या

CD

विद्यार्थ्यांनी जवानांना
पाठवल्या राख्या
गावतळे ः सीमेवरील जवानांसाठी दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केलेल्या राख्या आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य प्रा. संदीप वारके यांच्याकडे देण्यात आल्या. गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी निवृत्त नायब सुभेदार प्रताप पाटणे, निवृत्त हवालदार संदीप सावंत, प्राचार्या भक्ती सावंत, विस्तार अधिकारी बळीराम राठोड, पंचक्रोशी स्कूल कमिटी अध्यक्ष एन. वाय. पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मांडवकर आदी उपस्थित होते. हा उपक्रम २००४ पासून दापोलीतील गावतळे येथे सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात दापोलीतील कोळबांद्रे न. १ शाळा, शिवाजीनगर भौंजाळी शाळा, साखळोली नं. १, वेळवी शाळा, शिर्शी स्कूल, टेटवली येथील छत्रपती राजश्री शाहू वरिष्ठ कला महाविद्यालयाचे सहकार्य लाभले.

दाभोळमध्ये
प्रश्नमंजुषा स्पर्धा
गावतळे ः दापोली तालुक्यातील अंजुमन खैरूल इस्लाम ट्रस्ट, मुंबईअंर्तगत अंजुमन खैरूल इस्लाम सेमी इंग्लिश हायस्कूल दाभोळमध्ये ''हर घर तिरंगा'' संकल्पनाअंतर्गत प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा छोटा गट व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा झाली. ‘तहरीके आजादी’ नामक पुस्तकांमधील प्रश्न विचारले गेले. प्रत्येक गटाच्या एकूण पाच फेऱ्या झाल्या. त्यामध्ये प्रश्नफेरी, चित्रओळख, एक मिनिटात जास्तीत जास्त उत्तरे अशा फेऱ्या होत्या.

किसान सन्माननिधीचे
कोळबांद्रेत प्रक्षेपण
गावतळे ः दापोली तालुक्यातील कोळबांद्रे येथे किसान सन्माननिधी योजनेच्या २०वा हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. सीआरए पद्धतीने फळबाग लागवड प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्याकरिता सरपंच रघुनाथ गुरव, उपसरपंच शशिकांत शिगवण व ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी सीआरए पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

I.N.D.I.A Alliance Meeting Update: राहुल गांधींच्या निवासस्थानी पार पडलेल्या I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत झाले मोठे निर्णय!

Maharashtra Election Commission: निवडणुकीत घोळ झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने पाठवलं पत्र अन् म्हटलं...

UPI Down! गुग-पे, फोन-पे, पेटीएम सेवा कोलमडली, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

kapil sharma : कपिल शर्माच्या कॅनाडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार....लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी...पुढचा हल्ला मुंबईत करण्याचीही धमकी

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्य सरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर, मात्र...

SCROLL FOR NEXT