Why is UPI not working today : देशभरातील डिजिटल पेमेंटच्या कणा मानल्या जाणाऱ्या यूपीआय प्रणालीला आज मोठा फटका बसला आहे. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम या लोकप्रिय डिजिटल पेमेंट ॲप्सच्या सेवांमध्ये बिघड झाल्याने लाखो ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.