कोकण

-ग्रामपंचायत तळवडे येथे एक्स-रे तपासणी शिबिर यशस्वी

CD

तळवडेत एक्स-रे तपासणी शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : ग्रामपंचायत तळवडे, आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवडे, क्षयरोग पथक राजापूर आणि जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. ६) टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत एक्स-रे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १८५ रुग्णांची एक्स-रे व सीवायटीबी (CYTB) चाचणी करण्यात आली.
या शिबिरामध्ये टीबी प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी स्थानिक पातळीवर महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. शिबिराचे उद्‍घाटन ग्रामपंचायत तळवडे येथील सरपंच गायत्री साळवी, उपसरपंच शांताराम साळवी व सदस्या प्रेरणा गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात टीबीमुक्त भारत अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे. या अनुषंगाने हा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पीपीएम को-ऑर्डिनेटर श्रीकांत सावंत, जिल्हा सुपरवायझर मंगेश पाटील, एक्स-रे टेक्निशियन श्रीहांगे, एसटीएस राहुल कोकणे, एसटीएलएस आचल मळेकर तसेच राजापूर क्षयरोग पथक आणि प्राथमिक आरोग्यकेंद्र करत कारवलीतिठा येथील आरोग्य साहाय्यक टी. बी. पाटील, के. व्ही. भांडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, गटप्रवर्तक व सर्व आशा कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून एकूण १८५ रुग्णांची एक्स-रे व सीवायटीबी (CYTB)चाचणी करण्यात आली. टीबीमुक्त भारत या ध्येयाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ग्रामपंचायतीच्या, आरोग्य विभागाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने अत्यंत यशस्वी ठरले, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम!, जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही

Latest Marathi News Updates: देश-विदेशात आज दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT