कोकण

विद्यार्थ्यांच्या राखी स्टॉलला मळेवाडला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

82986

विद्यार्थ्यांच्या राखी स्टॉलला
मळेवाडला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. ८ ः ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राख्या बनविणे हस्तकलेत श्री कुलदेवता विद्यामंदिर मळेवाड शाळा क्र. २ च्या विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून निर्माण केलेल्या राख्यांचा स्टॉल येथील आठवडा बाजारामध्ये लावला होता.
या उपक्रमास महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे मुलांना विक्री कशी करावी, याचे व्यावसायिक ज्ञान प्राप्त झाले. या स्टॉलला महिलांनी भेट देत राख्या खरेदी केल्या. मळेवाड सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित नाईक यांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी मदत करणारे शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापक लवू सातार्डेकर विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते.
............................
82987

शिवसेनेकडून जवानांना राख्या
कुडाळ, ता. ८ ः ‘एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरील बांधवांसाठी’ या सामाजिक उपक्रमातून शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते व कुडाळ शिवसेना पदाधिकारी यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या बांधवांना रक्षाबंधनानिमित्त पोस्टाच्या माध्यमातून राख्या पाठवल्या. यावेळी सौ. पडते, कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, सचिव रेवती राणे, माजी सभापती नूतन आईर, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, उपतालुकाप्रमुख वैष्णवी शिंदे, तालुका समन्वयक दिक्षा सावंत, अनुप्रीती खोचरे, मृणाल परब, शुभांगी चव्हाण, दिक्षा आकेरकर, रचना नेरुरकर, संगीता खांडेकर, गौतमी कासकर, वैशाली पावसकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम!, जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही

Latest Marathi News Updates: देश-विदेशात आज दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT