-rat८p२.jpg-
२५N८२९६५
रत्नागिरी : जिल्हास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये यश मिळवल्याबद्दल नित्या फणसे हिचा पटवर्धन हायस्कूलमध्ये सत्कार करताना मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर.
-----
पटवर्धन हायस्कूलचे
प्रश्नमंजूषांमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातर्फे आंतरराष्ट्रीय युवादिनानिमित्त जिल्हास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन पटवर्धन हायस्कूलमध्ये करण्यात आले. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या.
पटवर्धन हायस्कूलमधील नित्या फणसे (इ. नववी अ) हिने प्रथम क्रमांक पटकावला. मार्तंड गावंड (इ. आठवी अ) याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. फणसे हिची राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा १० ऑगस्टला रोजी नेरूळ, नवी मुंबई येथे होणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनी नित्या फणसे व तिचे वडील संदीप फणसे यांचा सत्कार केला तसेच मार्तंड गावंड याचाही सत्कार केला. भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह दादा वणजू, सहकार्यवाह संजय जोशी, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, प्रा. तानाजी वाघमारे, विज्ञानप्रमुख शिरधनकर, विज्ञानशिक्षक राठोड या वेळी उपस्थित होते.