rat८p२९.jpg-
२५N८३०९५
सुरेश कदम
--------
सुरेश कदम लांजाचे नवे उपअधीक्षक
रत्नागिरी, ता. ८ : पोलिस निरीक्षक म्हणून यशस्वी काम करणारे पुणे शहर पोलिस क्राईम ब्रँचचे सुरेश दिनकर कदम यांची नुकतीच पदोन्नती झाली. त्यांची लांजा (जि. रत्नागिरी) येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. कदम हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. १९९५ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. त्यांनी मुंबई येथे पोलिस प्रशिक्षण पूर्ण केले. मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चार वर्षे उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर त्यांची बदली कोल्हापूर येथे झाली. कोल्हापूरनंतर रत्नागिरी शहर आणि जयगड पोलिस ठाण्यातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. विशेष म्हणजे उपनिरीक्षक असतानाच जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्याचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे ते पहिले अधिकारी ठरले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांना आता उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. शासनाने त्यांची लांजा उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी या पदावर नियुक्ती केली आहे. ते लवकरच आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.