कोकण

-उपविभागातर्फे उत्कृष्ट महसूल कर्मचार्‍यांचा सत्कार

CD

-rat८p३०.jpg-
P२५N८३११७
रत्नागिरी : नायब तहसीलदार श्रुती सावंत यांचा सत्कार करताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जीवन देसाई व अन्य अधिकारी.
------
उत्कृष्ट महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार
रत्नागिरी उपविभागातर्फे आयोजन ; महसूल दिनाचे औचित्य
रत्नागिरी, ता. ८ : महसूल दिनानिमित्त रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाच्यावतीने रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्‍या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे आदी अधिकारी उपस्थित होते. सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध असलेला हा विभाग असून, तळागाळातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल अशी कामे कर्मचाऱ्यांनी करावीत, असे मत या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त करताना सर्वच कर्मचाऱ्‍यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
या वेळी स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कर्मचाऱ्‍यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नायब तहसीलदार श्रुती सावंत, माधवी कांबळे, रिद्धी गोरे, सुदेश गोताड, मिलिंद सावंतदेसाई, साहाय्यक महसूल अधिकारी राजन गमरे, मनुश्री जोशी, रसिका खेडेकर, महेश आठल्ये, शुभांगी पाटील, मंडळ अधिकारी सुनील कीर, प्रतापसिंह पोले, अमर चाळके, उद्धव माने, महसूल साहाय्यक संजीवनी गोरे, रविकांत खाके, पल्लवी शेवाळे, विकास चव्हाण, प्रीती पाटील, पवन राठोड, ग्राममहसूल अधिकारी विश्वंभर मुरकुटे, सौरभ जाधव, सचिन पाटील आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Killed Hamas Commanders : इस्रायली सैन्याने घेतला ७ ऑक्टोबरचा बदला; हमास दहशतवादी संघटनेच्या टॉपच्या पाच कमांडर्सचा केला खात्मा!

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम!, जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही

SCROLL FOR NEXT