कोकण

कोळकेवाडी धरणावर लेझर शोद्वारे विद्युत रोषणाई

CD

rat१४p६.jpg-
P२५N८४४०९
चिपळूण : कोळकेवाडी धरणाच्या पाण्यावर लेझर शोच्या माध्यमातून अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कोळकेवाडी धरणावर आकर्षक रोषणाई
तिरंगी प्रकाशाने परिसर झळकला ; देशभक्तीपर गीतांचेही सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोळकेवाडी धरणावर गुरूवारी (ता. १४) सायंकाळी देशप्रेमाचा अद्वितीय सोहळा रंगला. धरणाच्या पाण्यावर लेझर शोच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करण्यात आली. तिरंगी प्रकाशात परिसर झळाळून निघाला होता. त्यात देशभक्तीची गाणी सुरू असल्याने उपस्थितांचे हृदय अभिमानाने भरून आले.
देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. अभियानात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. १३) ते शुक्रवार (ता.१५) या काळात राष्ट्रध्वजासोबत सेल्फी अपलोड करता येणार आहे. यंदा ''हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता, स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग'' या घोषवाक्यासह अभियान साजरे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोळकेवाडी धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गुरूवारी सायंकाळी सातनंतर लेझर शोच्या निमित्ताने धरणाचे ३ वक्र दरवाजे एकाचवेळी उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. पाणी सोडण्यापूर्वी कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाने नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. कोळकेवाडी धरणाच्या दरवाजांतून कोसळणारे पाणी, त्यावर पडणारे हिरवे, केशरी, पांढरे किरण आणि पाण्याच्या तुषारांत नाचणारे प्रकाशचित्र ही नजर खिळवून ठेवणारी जादू अनुभवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी धरण परिसर गजबजून गेला. शोदरम्यान भारताचा तिरंगा, स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यगाथा आणि सैनिकांच्या पराक्रमाचे चित्रण आकाशात व पाण्याच्या पडद्यावर झळकले.
‘वंदे मातरम्’, ‘जन-गण-मन’च्या स्वरांतून संपूर्ण परिसर भारावून गेला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ टिपून ते कायमस्वरूपी जतन केले. या सोहळ्यामुळे कोळकेवाडी धरण परिसरात पर्यटनाची आणखी एक आकर्षक ओळख निर्माण झाली असून, पावसाळ्यातील पाण्याच्या साठ्याबरोबरच स्वातंत्र्याचा उत्सव लोकांच्या मनात कायमचा कोरला गेला.

चौकट
चिपळूणच्या पूरनियंत्रणाला मदत
कोयना धरणातील पाण्यावर टप्पा एक, दोन आणि चारमध्ये वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी कोळकेवाडी धरणात साठवले जाते. कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी तिसरा टप्पा आहे. धरणातील पाण्याची क्षमता एक टीएमसी आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातून येणारे पावसाचे पाणीसुद्धा याच धरणात साठवले जाते. त्यामुळे चिपळूणच्या पूरनियंत्रणाला मोठी मदत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT