-rat२२p३५.jpg-
२५N८६३९७
रत्नागिरी : टिळक आळी शताब्दी गणेशोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.
-------
बुद्धिबळाच्या पटावर गोगटे अजिंक्य
जिल्ह्यास्तरीय स्पर्धा; रायकरची कामगिरी लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : टिळक आळी गणेशोत्सव मंडळ, श्री मारूती, गणपती पिंपळपार देवस्थान यांनी शताब्दी गणेशोत्सवाचे औचित्य साधून आयोजित जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत यश गोगटे अजिंक्य ठरला. शेवटच्या फेरीत पहिल्या बोर्डवर खेळणारा वरद पेठे पहिल्या सहा फेऱ्या जिंकून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. एक सामना बरोबरीत सोडवलेल्या यश गोगटेने वरदला शेवटच्या फेरीत हरवत सातपैकी साडेसहा गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
टिळकआळीतील वैद्य मंगल कार्यालयात ही स्पर्धा झाली. अनिकेत रेडीजने अखेरच्या फेरीत तेजस्वर कांबळेचा पराभव करत विजय मिळवला व आपले तिसरे स्थान निश्चित केले. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये फारसे धक्कादायक निकाल न लागल्याने पुढील चारही फेऱ्यांमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली. १२ वर्षाच्या आयुष रायकरने अतिशय सुरेख खेळाचे प्रदर्शन करत शेवटचे तीनही डाव अनुभवी व ज्येष्ठ फिडे मानांकित खेळाडूंसोबत जिंकले व सर्वांचीच वाहवा मिळवली. मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे व विश्वस्त मंदार खेर यांच्यातील डावाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पंच म्हणून विवेक सोहनी व मानस सिधये यांनी काम पहिले. अध्यक्ष शशिकांत काळे, अरूण करमरकर, सचिव राहुल काळे, सीए मंदार गाडगीळ, स्पर्धाप्रमुख मनोहर केळकर, सचिन करमरकर, सीए मंदार जोशी, गुरूप्रसाद जोशी, प्रफुल्ल पेठे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
-----------
चौकट १
स्पर्धेचा निकाल असा : खुला गट - यश गोगटे, वरद पेठे, अनिकेत रेडीज, आयुष रायकर, प्रणव मुळ्ये, आयुष मयेकर, सौरिश कशेळकर, साईप्रसाद साळवी, विवेक जोशी, साहस नारकर, तेजस्वर कांबळे, प्रवीण सावर्डेकर, यश खेर, सोहम रूमडे, अपूर्व बंदसोडे. सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू ः सुनील शिंदे, सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू सई प्रभुदेसाई, जिज्ञासा सावंत (वयोगट ३६-५५). मंगेश मोडक, जितेंद्र पटेल (वयोगट १६-३५). श्रीहास नारकर, मोहम्मद सोलकर. *पंधरा वर्षाखालील गट – निधी मुळ्ये, नंदन दामले, आर्यन धुळप, पद्मश्री वैद्य, सिद्धेश चव्हाण. बारा वर्षाखालील गट अलिक गांगुली, अथर्व साठे, रूद्र जोशी, ओम तेरसे, राघव पाध्ये. नऊ वर्षाखालील गट आरव निमकर, शुभम कोठारकर, देवांग वैद्य, राजस नाईक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.