
कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना यापुढे ‘चाकरमानी’ असे न म्हणता त्यांना ‘कोकणवासीय’ म्हणून संबोधण्यात यावे, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. चाकरमानी असे अवमानकारक संबोधन हटवून अजित पवार यांनी कोकणवासीयांचा स्वाभिमान जागवल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात लवकरच शासन परिपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे.