कोकण

उपसरपंचपदी नामये

CD

जावडे ग्रुपग्रामपंचायत
उपसरपंचपदी नामये
लांजाः तालुक्यातील जावडे ग्रुपग्रामपंचायतीच्या गेले सहा महिने रिक्त असलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत उपसरपंचपदी सूर्यकांत नामये यांची नुकतीच बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे तालुक्याभरातून अभिनंदन करण्यात येत आहे. जावडे ग्रुपग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच चंद्रकांत गवाणकर यांनी आपल्या वैयक्तीक कारणामुळे उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मागील सहा महिने हे पद रिक्त होते. त्यामुळे प्रशासनाने या पदाची निवडणूक जाहीर केली होती; मात्र उपसरपंचपदासाठी एकमेव नामये यांचा अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.

खेडचा ओंकार सुर्वे
‘मनसे श्री’चा मानकरी
खेड ः मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून मनसे व राजवैभव प्रतिष्ठान आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत येथील स्टॅलियन जिमच्या ओंकार सुर्वे याने ‘मनसे श्री’चा किताब पटकावला. बॉडीबिल्डिंग अॅण्ड फिजिक्स स्पोर्टस् असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या स्पर्धेत २५हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. दापोलीतील लाईफस्टाईल फिटनेसच्या आदित्य कारेकरला मनसे युवा तर मंडणगडच्या न्यू गोल्ड जिमच्या रोशन लोखंडेला बेस्ट पोझरचा किताब मिळाला. पंच म्हणून इरफान काद्री, महेश वादक, सुरज पाटणे, बंधू भुरण, सदानंद बारटक्के, राज कारेकर यांनी काम पाहिले. विजेत्यास मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या हस्ते ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष आखाडे, नंदू साळवी, शैलेश धारिया, राजा जोयसर, स्वप्नील नरळकर, दादू नांदगावकर आदी उपस्थित होते.

देवरूख-मार्लेश्वर
रस्त्यावर झाडी
देवरूख ः देवरूख मार्लेश्वर रोडवर नेहमीच असंख्य भाविकांची आणि पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांची वर्दळ असते. आंगवली ते मारळदरम्यान काही भागात रस्त्यावर आलेली झाडी वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी फार धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी वळणावर झाडी आल्यामुळे वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या ४ दिवसांवर गणेशोत्सव येत असून, आजुबाजूच्या गावात मुंबईकर चाकरमान्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर पाहायला मिळते. तरी कुठला अपघात होण्याआधी संबधित यंत्रणांनी ही रस्त्यावर आलेली झाडी तत्काळ हटवावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

गडनदीकाठच्या
भातशेतीचे नुकसान
संगमेश्वर ः गेला आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीचा फटका संगमेश्वर तालुक्यातील गडनदीलगत असलेल्या भातशेतीला बसला आहे. गेले आठ दिवस ही भातशेती पुराच्या पाण्याखाली राहिल्याने पुरती कुजून गेली आहे. यावर्षी जून, जुलै व ऑगस्टच्या पहिल्या पंधरावड्यात या शेतीला पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते; परंतु अनपेक्षित अतिवृष्टी झाल्याने गडनदीच्या पुराचा फटका नदीपात्राशेजारील भातशेतीला बसल्याने येथील शेतकरी हवालदील झाला आहे. येथील हळवी भातशेती पसवण्याच्या जवळ आली होती; परंतु पुराच्या विळख्यात भातपिक सापडल्याने शेतीची नासाडी झाली आहे. यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

ऋतुजा मोहितेचे
एलएलबीत यश
रत्नागिरी ः ऋतुजा मोहिते हिने मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजमधून आपले एलएलबीचे शिक्षण पूर्ण करून मोठे यश संपादन केले. मुंबईतील सिद्धार्थ लॉ कॉलेज येथे झालेल्या पदवीदान समारंभात माजी कुलगुरू अभय ओक यांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सध्या ऋतुजा मुंबई युनिव्हर्सिटी फोर्टमधून एलएलएमचे पुढील शिक्षण घेत आहे. ऋतुजाच्या वडिलांची इच्छा होती की, मुलीने वकिलीचे शिक्षण पूर्ण करावे. ऋतुजाने आज त्यांची ही इच्छा पूर्ण केली. दुर्दैवाने, हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आज ते या जगात नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT