swt264.jpg
87205
कुडाळः ‘सिंधुदुर्ग राजा’चे आगमन ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर भक्तिमय वातावरणात झाले. (छायाचित्र ः अजय सावंत)
‘सिंधुदुर्ग राजा’ची आज
कुडाळात प्राणप्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः येथे विराजमान होणाऱ्या ‘सिंधुदुर्ग राजा’चे आगमन काल (ता. २५) सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर भक्तिमय वातावरणात झाले. उद्या (ता. २७) सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
‘सिंधुदुर्ग राजा’ गणरायाचे यावर्षी १६ वे वर्ष आहे. येथील पोस्ट कार्यालयाजवळ सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी सिंधुदुर्ग राजा २१ दिवसांचा असणार असून त्याचे आगमन काल सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर, फटाक्यांची आतषबाजी करीत आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, ओंकार तेली, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, कुडाळ शहरप्रमुख अभी गावडे, महिला शहरप्रमुख श्रुती वर्दम, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, रत्नाकर जोशी, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, भाजप शहर अध्यक्ष सुनील बांदेकर, रुपेश कानडे, उपजिल्हाप्रमुख स्वरुप वाळके, राकेश कांदे, राकेश नेमळेकर, युवक तालुकाप्रमुख सागर वालावलकर, प्रसन्ना गंगावणे, नागेश नेमळेकर, रेवती राणे, विश्वास पांगुळ, बाळा पावसकर, चेतन पडते, चंदन कांबळी, अनुप्रीती खोचरे, संदेश सुकळवाडकर आदी उपस्थित होते.