कोकण

तंटामुक्त अध्यक्षपदी जाधव

CD

नावडीत रक्तदान
शिबिर उत्साहात
संगमेश्वर ः धर्मवीर आंनद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद नावडी गट शिवसेना युवासेनेच्यावतीने नावडी ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये अनेकांनी रक्तदान केले. सामाजिक कार्यामुळे मिळणारे समाधान हे एक मोठे भावनिक बक्षीस आहे. रक्तदान हा समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक जबाबदार आणि महत्त्वाचा संदेश आहे, ज्यामुळे जीवन वाचवता येते आणि समाजाच्या आरोग्यात सुधारणा मदत होत असल्याचे प्रतिपादन शिबिराचे आयोजक उपतालुकाप्रमुख सुधीर चाळके यांनी केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उपतालुकाप्रमुख सुधीर चाळके, विभागप्रमुख प्रथमेश साळवी, उपविभागप्रमुख ओंकार चव्हाण, वांद्री युवा शाखाप्रमुख विराज सालीम, सुनील जोशी यांनी परिश्रम घेतले तर वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांनी रक्तसंकलन करण्यासाठी सहकार्य केले.

rat२६p१२.jpg-
२५N८७१६७
विजय जाधव

तंटामुक्त समिती
अध्यक्षपदी जाधव
लांजा ः लांजा तालुक्यातील बेनीखुर्द-खेरवसे ग्रुपग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी खेरवसे गावचे सुपुत्र व लांजा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. बेनीखुर्द-खेरवसे ग्रुपग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच ग्रामपंचायत येथे पार पडली. या वेळी बेनीखुर्द व खेरवसे या दोन्ही गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली. या वेळी उपस्थित सभागृहातील सर्वानुमते लांजा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असलेले खेरवसे गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व जाधव यांच्या नावाची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी बेनीखुर्द-खेरवसे ग्रामपंचायतीचे गेली १५ वर्षे उपसरपंचपदाचा कार्यभार उत्तमरीत्या सांभाळला आहे. यांसह समाजिक, शैक्षणिक व जनसुविधांबाबत अभ्यासू असणारे जाधव यांची नागरिकांशी सलोख्याचे संबंध आहेत. बेनीखुर्द-खेरवसे गावांमध्ये शांतता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जाधव यांची बेनीखुर्द-खेरवसे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड होताच अभिनंदन केले जाते आहे.

‘लांज्यात पाण्याचा
तुडवडा होऊ देऊ नका’
लांजा ः लांजा तालुक्यात आलेल्या मुंबईकरांना तसेच स्थानिकांना गणपती उत्सवात पाण्याचा तुडवडा पडणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना आमदार किरण सामंत यांनी दिल्या. लांजा-राजापूर विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी लांजा तालुक्यातील जलजीवन मिशन कामाचा आढावा घेतला. या वेळी लांजा तालुक्यामधील कोणत्याही व्यक्तीला पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आदेश संबंधी विभागाला देण्यात आल्या. गणपती सणाच्या पार्श्वभूमीवरती यापूर्वी आढावा घेण्यात आला. येणाऱ्या चाकरमानांना कोणताही पाण्याचा त्रास होऊ नये, या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार सामंत यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. या बैठकीला उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा शिल्पा करंडे यांच्यासहित इतर अधिकारी उपस्थित होते.

भक्ती रत्नागिरीतर्फे
सारी ड्रेपिंग कार्यशाळा
रत्नागिरी ः महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्था, संचालित बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रत्नागिरीतर्फे ‘सारी ड्रेपिंग कार्यशाळेचे’ आयोजन KVTI मारुती मंदिर रत्नागिरी येथे करण्यात आले होते. साडी नेसण्याच्या विविध प्रकारच्या पद्धती याचे प्रशिक्षण देण्यात आले. सारी ड्रेपिंग कार्यशाळेमध्ये लागणाऱ्या मॉडेल्स ब्युटी अँड वेलनेस डिपार्टमेंटच्या विद्यार्थिनींनीसुद्धा सहभाग घेतला होता. यामध्ये सहावारी साडी, ब्राह्मणी साडी, नऊवारी साडी, सहावारीपासून नऊवारी साडी, साडीचा वापर करून घागरा कशाप्रकारे नेसायचा, गुजराती पॅटर्न साडी कशाप्रकारे नेसायची याचे प्रशिक्षण घेण्यात आले. ही कार्यशाळा सिद्धी सावंत यांच्या हस्ते पार पाडण्यात आली. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये ही कार्यशाळा झाली.

‘विज्ञान नाट्य’मध्ये
बांदल शाळेचे यश
चिपळूण ः पंचायत समिती चिपळूण व चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच विज्ञान नाट्य महोत्सव आयोजित विज्ञान नाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी १० शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एल. एम. बांदल स्कूल, काविळतळी या शाळेने सुंदररित्या विज्ञाननाटिका सादर करत प्रथम क्रमांक मिळवला. माहितीपर नाटिका सादर करून या शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळे पुढील जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवासाठी ही शाळा पात्र ठरली. या विज्ञान नाटिकेचे उत्तमपणे दिग्दर्शकाचे काम ज्येष्ठ शिक्षिका बागूल यांनी केले. त्यांना विज्ञानशिक्षिका साठे यांनी साथ दिली. या यशाबद्दल पेरेंट्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन भास्कर जाधव, विक्रांत जाधव, शालेय कमिटीचे चेअरमन मिलिंद कापडी, सेक्रेटरी बी. डी. शिंदे, फैजल कासकर, बाळा अंबुर्ले, समन्वयक ज्योती कुलकर्णी, मुख्याध्यापिका साक्षी शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack : पीएमपी चालकाला ह्रदयविकाराचा झटका; लक्ष्मी रस्त्यावरील घटना

Manchar News : लग्नाऐवजी दशक्रिया; क्षीरसागर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, मंचर येथील दुर्दैवी घटना

Thane Traffic: गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात वाहतूक बदल; अनेक मार्ग बंद, पाहा पर्यायी मार्ग कोणते?

Ganesh Chaturthi 2025 Marathi Wishes: आला आला माझा गणराज आला...! गणेश चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा मराठीतून भक्तीमय शुभेच्छा

Latest Maharashtra News Updates: महापालिकेतील सुरक्षारक्षकांना मिळणार नवीन शस्त्र

SCROLL FOR NEXT