कोकण

दिगवळे, नाटळधील डोंगर खचतोय

CD

swt2814.jpg
87737
कणकवलीः यंदाच्या झालेल्‍या अतिवृष्‍टीमुत नाटळ येथील डोंगरा कडा कोसळला.

swt2815.jpg
87738
दिगवळे ः येथील गावात चार वर्षापूर्वी झालेल्‍या ढगफुटी पावसानंतर डोंगर कडा कोसळून एक घर गाडले गेले होते.

दिगवळे, नाटळधील डोंगर खचतोय
बदलत्‍या हवामानाचा फटकाः धोकादायक भागांचे सर्वेक्षण होणे गरजेचे
राजेश सरकारेः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २८ः नुकतेच जम्मू, हिमाचल प्रदेश, आसाम आदी राज्‍यांमध्ये डोंगरकडे कोसळून अनेकांना जीव गमवावे लागले. हिमालयाच्या तुलनेत सह्याद्री हा काळ्याकभिन्न बेसाल्ट पाषाणाने बनलेला कणखर, राकट पर्वत मानला जातो. मात्र, वृक्षतोड आणि बदलत्या हवामानाचा कणखर सह्याद्रीला देखील फटका बसू लागला आहे. सह्याद्रीच्या पायथ्याखाली वसलेल्या दिगवळे, नरडवे तसेच लगतच्या परिसरातील डोंगर खचत असल्‍याने इथल्‍या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावे तिन्ही बाजूंच्या डोंगर रांगांनी वेढलेली आहेत. गावातील नागरिकांना हे डोंगर म्‍हणजेच संरक्षण तटबंदी वाटतात. पण यातील ठिसूळ माती दगडाचे डोंगर पावसाळ्यात कमकुवत होत असल्‍याने ते गावकऱ्यांना आता संकट वाटू लागले आहेत. प्रामुख्याने दिगवळे, नाटळ आणि कुंभवडे गावांमध्ये ही परिस्थिती आहे. दुसरीकडे वैभववाडी तालुक्‍यातील सडूरे गावातही १७ ऑगस्टला डोंगर रस्त्यावर आल्याने तब्‍ब्‍ल पाच तास वाहतूक खोळंबली होती.
दरम्‍यान, भिरवंडे व इतर गावांत प्रामुख्याने एकसंध काळाकभिन्न बेसॉल्‍ट खडकाचाच पूर्ण डोंगर असल्‍याने इथे दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्‍या नाहीत. दिगवळे, नाटळ, कुंभवडे या गावांच्या वर सह्याद्रीचा कडा आणि त्‍यापुढे काळम्‍मावाडी धरणाचे बॅकवॉटर आहे. वर्षभर हे पाणी इथल्‍या डोंगरामध्ये मुरते. त्‍यामुळे उन्हाळ्यात या गावांत पाण्याची टंचाई निर्माण होत नाही. पण, पावसाळा कालावधीत सलग आठ ते दहा दिवस संततधार पाऊस राहिला तर डोंगरातील माती खाली येते.
यंदा सिंधुदुर्गात १२ मे पासून दमदार पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यात तर ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाला. त्‍यामुळे नाटळ गावातील फळसाचा माळ या भागातील डोंगराचा भाग प्रचंड आवाज होऊन कोसळला. यात डोंगर रांगातून आलेले दगड माती थेट गडनदीपात्रात विसावले. त्‍यामुळे या भागातील नामदेव सावंत व इतरांची घरे बचावली. जीवितहानी ही टळली. त्‍यामुळे सह्याद्री पट्ट्यात ज्‍या ज्‍या ठिकाणी असे धोकादायक भाग आहेत, त्‍यांचे सर्वेक्षण करावे आणि पर्यायी उपाययोजना कराव्यात अशी इथल्‍या नागरिकांची अपेक्षा आहे.
चार वर्षापूर्वी म्‍हणजेच २३ जुलै २०२१ राजी दिगवळे गावातील रांजनवाडी डोंगर कोसळला होता. या भूस्खलनात डोंगरातील माती घरावर आली. यात एकाचा मृत्‍यू झाला होता तर एका महिलेला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. या घटनेनंतर यंदा नाटळ येथील डोंगर कडा कोसळल्‍याने दिगवळेतील भूस्खनाच्या आठवणी जाग्‍या झाल्‍या होत्या.

चौकट
जंगलतोड, वणव्यांचा फटका
सह्याद्री पट्ट्यात वनविभाग आणि खासगी मालकीच्या जमिनी आहेत. यातील वनविभागाच्या ताब्‍यातील क्षेत्र सुरक्षित आहे. मात्र, अनेक खासगी जमीन मालकांनी सह्याद्री पर्यटनाचा ट्रेंड सुरू करून फार्महाऊस उभी केली जात आहेत. सागरी पर्यटनाप्रमाणे सह्याद्री पर्यटनालाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्‍यामुळे गावात रोजगाच्या संधी निर्माण होतात. या फॉर्महाऊसला जोडण्यासाठी रस्तेही तयार केले जातात. मोबाईल टॉवर उभे केले जातात. त्‍यासाठी वनसंपदेची मोठी तोड केली जाते. जमीनीची मोठ्या प्रमाणात खुदाई होते. याखेरीज दरवर्षी मे महिन्यात सह्याद्री डोंगररांगात वणवा पेटतो. त्‍यामुळे माती धरून ठेवणारी झाडे जळून जातात. यात देखील इथली जमीन कमकुवत होत आहे. त्‍याचा परिणाम सह्याद्री ढासळण्यावर होत असल्‍याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.

कोट
दोन दशकांपूर्वी सह्याद्रीतील मातीची धूप ही सुमारे ५ ते १० हजार हेक्टर प्रतिवर्ष मेट्रिक टन इतकी होती. मात्र, १९९० पासून पश्चिम घाटातील ही टक्केवारी १२१ टक्क्यांनी सरासरी वाढली आहे, असा अहवाल आयआयटी मुंबईने दिलेला आहे. याचा अर्थ सह्याद्री डोंगररांगात मानवी हस्तक्षेप वेगाने वाढतोय. खाड्या, नद्या गाळाने भरल्‍या जाताहेत. सह्याद्रीपट्ट्यातील मातीची ही धूप थांबविण्यासाठी आगामी २५ वर्षांचा आराखडा तयार करून कोकणच्या समृद्धीसाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखायला हवा.
- डॉ. सुमंत पांडे, नदी व जल अभ्यासक

कोट
दरड कोसळणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण, त्‍याचा आपल्‍या सह्याद्रीला फारसा धोका नव्हता. कारण लाव्हा रसाच्या अनेक थरांनी सह्याद्रीची निर्मिती झालीय. पण, अलीकडच्या काळात वातावरणीय बदलामुळे कमी कालावधीत प्रचंड पाऊस पडतो. दुसरीकडे नवीन रस्ते, बांधकामे तयार करताना पूर्वी नाले, ओहोळ यांचे मार्ग काही प्रमाणात बदलले जातात किंवा त्‍यामध्ये अडथळे निर्माण होतात. माधवराव गाडगीळ यांनी आपल्‍या अहवालात नद्यांच्या उगम परिसरात कोणत्‍याही प्रकारचं बांधकाम नको असे सूचवलं होते. पण, त्‍याचीही अंमलबजावणी झाली नाही. त्‍यामुळे कमी कालावधीत प्रचंड पाऊस झाला तर डोंगर कोसळल्‍याचे प्रमाण वाढतच जाणार आहेत.
- किर्ती वाणी, जल आणि पर्यावरण अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT