-rat28p25.jpg-
25N87755
रत्नागिरी ः वाटद येथे एमआयडीसीला असलेला विरोध व्यक्त करताना ग्रामस्थ.
------
‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक
वाटदवासीयांचे गणरायाला साकडे ; चाकरमान्यांमुळे मिळाले बळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील काही घरांवर लागलेले आहेत. आमच्या गावावर आलेले संकट कायमचे हद्दपार कर, असे साकडेही काही ग्रामस्थांनी गणरायाकडे घातले आहे. त्यामुळे हे फलक जिल्हाभरात चर्चेचा विषय बनलेले आहेत.
वाटद एमआयडीसीविरोधात ग्रामस्थांकडून विरोध सुरू झालेला आहे तर वाटद पंचक्रोशीत एमआयडीसी रेटण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे, असा आरोप केला जात आहे. दोन हजार दोनशे एकर जमीन संपादित केली जाणार आहे. बागायती, घरेदारे जाणार असल्याचे समजताच ग्रामस्थांकडून विरोधाला सुरुवात झालेली आहे. यासंदर्भात या अगोदर आंदोलन, लोकप्रतिनीधींनाव प्रवाशसनाला निवेदनही ग्रामस्थांनी दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून ऐन गणेशोत्सवात वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घरादारावर एमआयडीसी विरोधाचे फलक लावले आहेत. या फलकावर ‘एकच जिद्द वाटद एमआयडीसी रद्द’, अशा आशयाचा मजकूर लिहला आहे. डोळे मिटून झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग येऊ दे, अशी प्रार्थना ग्रामस्थांनी गणरायाकडे केली आहे. वाटद, कोळीसरे, गडनरळ, वैद्यलागवण, कळझोंडी आणि मिरवणे येथे होणाऱ्या एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध होत असून, चाकरमान्यांनी मुंबईत जनसंवाद सभेत विरोध दर्शवला होता. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी आले आहेत. एमआयडीसी विरोधातील फलक घरावर लावून ग्रामस्थांनी आपला लढा तीव्र केला. या लढ्यात चाकरमानी सहभागी झाले आहेत. भविष्यात हा लढा आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोट
आमच्या गावावर आलेले हे विनाशकारी संकट कायमचं नष्ट कर, असं साकडं गणरायाला घातलं आहे. सर्वच गावात हे फलक घरावर लावले आहेत.
-संतोष बारगुडे, अध्यक्ष, वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.