कोकण

स्वातंत्र्याची सिंहगर्जनातून उलगडला शिवकालीन इतिहास

CD

- rat१p२.jpg-
P२५N९५८८१
पावस ः येथे नवरात्र उत्सवात झालेल्या ‘स्वातंत्र्याची शिवगर्जना’ या नाटकातील कलाकार

शिवकालीन नाट्य प्रयोगाला प्रेक्षकांची वाहवा
अजिंक्य थिएटर्स् चा प्रयोग ; किल्ले जिंकण्याची इच्छा पूर्ण करण्याचा मनोदय
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १ ः छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले जिंकण्याची इच्छा शिलेदार तानाजी, येसाची, कान्होजी यांच्या साथीने कशी कशी पूर्ण होते. ‘स्वातंत्र्याची सिंहगर्जना’ या नाटकातून उलगडण्यात आले आहे. गणेशगुळे येथील अजिंक्य थिएटर्सने हा नाट्य प्रयोग यशस्वी केला आहे. डॉ. जगन्नाथ तोडणकर यांच्या लेखणीतून उतरलेले हे नाटक आहे.
पावस येथील श्री नवलादेवी नवरात्रोत्सवात नवलादेवी रंगमचावर हे नाटक रंगतदार झाले. छत्रपती शिवाजी महाराज प्रबळगड जिंकण्यासाठी शिलेदार तानाजी, येसाजी आणि कान्होजी यांच्याकडे जबाबदारी देतात. या कामगिरीत त्यांना ज्योत्याजी रावाची मुलगी गिरजा हिची साथ मिळते. ही कामगिरी करताना ज्योत्याजींना व कान्होजींना फितूरीमुळे कैद होते. प्रबळगडाचा किल्लेदार केसरसिंह याला एक मराठी सरदार साबाजी निंबाळकर हे फितूर झालेले असतात. त्यांना सोडविण्यासाठी गिरीजा नाच गाणी करुन कैदखान्यातील पहारेकरी अब्दुल्लाला खूश करते आणि त्यांच्याकडून चाव्या हस्तगत करते. येसाजीच्या मदतीने ज्योत्याजी व कान्होजी यांची सुटका करतात. त्यानंतर युद्ध होऊन प्रबळगड ताब्यात घेतात. मग त्या किल्याची किल्लेदार म्हणून महाराज जुना जाणता सरदार ज्योत्याजीराव यांचीच नेमणूक करतात. ज्योत्याजीरावांची मुलगी गिरीजा व कान्होजी जेधे यांचे लग्न महाराजांच्या उपस्थितीत होईल, असे जाहीर करतात. अशी कथा या शिवकालीन नाट्य कलाकृतीत रंगविण्यात आली आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी दशरथ रांगणकर, अरुण धावडे, अजय पानगले, सुदेश नाटेकर, उमेश आंबेकर, रवीद्र रानडे, मिलींद पाटील, आशिष सावंत, कौस्तुभ पाटील, सावली पवार, मावळे ः महेश धालवलकर, अमोल घवाळी, अजीत हातीसकर, चारुदत्त धालवलकर, दिपक घवाळी, विनित हरमले, तुषार घामत, यांच्या उत्तम अभिनयाने रंगतदार झाले. या नाटकाची निर्मिती काशिनाथ डोंगरे यांची होती. नेपथ्य वेशभूषा दशरथ रांगणकर, रंगभूषा उलेश खंदारे, प्रकाश योजना संतोष नार्वेकर, संगीत योगेश मांडवकर, तबला साथ ओंकार लिंगायत, सुत्रधार सुधाकर गुरव, तालरक्षक विघ्नेश पावसकर यांची साथ मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Shubh Muhurat 2025 : दसरा पूजनाची सर्वोत्तम वेळ कधी, अन् रावण दहनानंतर कोणतं काम करावं?

Vani News : आदिमाया सप्तशृंगी मातेच्या कीर्तीध्वजाची भव्य मिरवणूक.. गडाच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तीध्वज डौलात फडकणार....

वेळापत्रक आरक्षणाचे! झेडपीच्या गटाची अन्‌ पंचायत समित्यांच्या गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; जिल्हाधिकारी पाठविणार एससी, एसटी प्रवर्गातील जागांचा प्रस्ताव

IND vs WI, 1st Test: 'कर्णधार' गिलच्या भारतातील पहिल्याच कसोटीवर पावसाचे काळे ढग? जाणून घ्या हवामान अंदाज

Ravindra Dhangekar News : नीलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांतदादा गप्प का? ; रवींद्र धंगेकरांचा सवाल!

SCROLL FOR NEXT