कोकण

पावस ः कापलेले भात पावसाने भिजले

CD

rat15p27.jpg -
98767
निरूळ - परिसरामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे खाचरामध्ये कापून ठेवलेले भातपिक भिजले.

कापलेले भात पावसाने भिजले
पावस परिसरातील स्थिती; ५० टक्के कापणी पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १५ः पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तयार भातशेती कापण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली होती. परतीच्या पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी तातडीने भात कापण्याला वेग आला होता. आतापर्यंत पावस परिसरात ५० टक्के भातशेती कापून पूर्ण झालेली आहे. आज अचानक आलेल्या पावसाने कापलेले भात भिजले आहे.
पावस परिसरामध्ये २० मे पासून सुरवात झालेल्या पावसाने ऑक्टोबरमध्ये पूर्णतः विश्रांती घेतली होती. त्यामुळे यावर्षी भातकापणीला अनुकूल वातावरण होते. पावसाच्या विश्रांतीनंतर तयार झालेली भातरोपं कापण्यास सुरवात झाली; परंतु हवामान विभागाकडून येत असलेल्या संदेशामुळे शेतकरी सकाळी कापणी उरकून घेत होता. त्यानंतर सायंकाळी सुकलेले भात उचलून झोडणी आटपत होता. आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रावरील भातकापणी पूर्ण झाली होती. उर्वरित भातकापणीला वेग आला आहे; परंतु त्यात पावसाचा व्यत्यय आला आहे. पावस परिसरात सायंकाळी विजांच्या गडगडाटासह पावसाने सुरवात केली. सुमारे अर्धा ते पाऊण तास दमदार पाऊस पडला. त्यामुळे आज सकाळी कापलेले भात पावसाने भिजून गेले. भातखाचरामध्ये पाणी साठले असून, पाऊस सुरू राहिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सायंकाळी पाऊस पडल्यामुळे भिजलेली भातरोपं सुकणे अशक्य आहे. ते भात काळं पडण्याची शक्यता आहे.

कोट
यावर्षी पावसाने दरवर्षीच्या तुलनेत दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीला पोषक वातावरण होते; मात्र पाऊस पडल्याने भातशेती धोक्यात आली आहे. गेले आठ दिवस भातकापणीच्या कामांना वेग आला होता. आता तो मंदावण्याची शक्यता आहे.
- नीलेश ठीक, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accidental Gunshot Incident : धक्कादायक! शिकारीसाठी बंदूक रोखली झुडूप हालताच गोळी झाडली अन्, पुढे मित्र होता... नेमकं काय घडलं?

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची लाट ! गोंदियाने महाबळेश्वरलाही टाकले मागे ; राज्यातील इतर भागांत कसे आहे हवामान? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : गोरेगाव आरे कॉलनीत भीषण अपघात

Yeola News : जीवघेणा नायलॉन मांजा! येवल्यात युवकाचा गळा चिरला, श्वासनलिकेला गंभीर दुखापत

इंडिगोतील गोंधळाचा फटका आमदारांनाही, नागपूरला अधिवेशानासाठी जाणाऱ्यांचं तिकीट रद्द; विमानतळावरही मोठा गोंधळ...

SCROLL FOR NEXT