कोकण

आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार

CD

०२६७१

आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ः ‘स्थानिक’साठी भाजप कार्यकर्त्याना फर्मान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील आणि नगराध्यक्ष महायुतीचाच असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज चिपळूणला सांगितले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज त्यांनी प्रथमच चिपळूणला भेट दिली. चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात भाजपचा मेळावा झाला.
ते म्हणाले, ‘‘देशात आणि राज्यात एकविचाराची सत्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही एकविचाराची सत्ता आली पाहिजे. महायुतीचा नगराध्यक्ष झाला तर कार्यकर्त्यांना न्याय देणे सोपे होते. राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि नंतर स्वतः, हीच भाजपची भूमिका आहे. २०२४ पासून देशाची दिशा संपूर्ण जगभर उंचावली आहे. देशहित जपण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपला पक्ष अहोरात्र कार्यरत आहे.’’
चव्हाण म्हणाले, ‘‘प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा चिपळूणमधील हा पहिलाच दौरा असून, येथे मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पक्षाच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक आहे. भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक आज पक्षात दाखल होत आहेत. यादव यांच्या पत्नी स्वप्ना या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असून, त्यांचे उत्तम नियोजन कौशल्य आज पाहायला मिळाले. यादव यांचे काम अत्यंत प्रभावी आहे आणि त्यामुळे २०२९च्या निवडणुकीत त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. त्यांच्या रूपाने चांगले नेतृत्व पुढे येणे अत्यावश्यक आहे.’’
प्रशांत यादव यांनी प्रास्ताविक केले.
माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रशांत यादव आदी उपस्थित होते.

पारदर्शकता हीच
भाजपची कार्यशैली
माजी पंतप्रधान जीव गांधी यांनी सांगितले होते की, केंद्राकडून आलेल्या रुपयातील लाभार्थ्यांपर्यंत फक्त १५ पैसेच पोहोचतात; परंतु आता काळ बदलला आहे. केंद्र सरकारकडून आलेले १०० टक्के पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचतात, हीच पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची भाजपशैली आहे. आज कार्यकर्त्यांमुळेच पक्ष तळागाळात मजबूत झाले आहे. आपण जे कार्य करू ते जनतेच्या सेवेचे असले पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये शिवसेनेची हवा! ११ पैकी ५ नगरपालिकांवर भगवा; त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला मोठा धक्का

मीच नाही तर सोहमही त्याचं घर सोडून आलाय... लग्नानंतरच्या बदललेल्या आयुष्याबद्दल पूजा बिरारीचा खुलासा, म्हणते-

VIDEO : शाळेत मानसिक छळ, लिंगभेद आणि अपमानास्पद वागणूक; शिक्षिकेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप

Bike Helmet Tips: हेल्मेट घातल्यावर गुदमरल्यासारखे होतय? 'हे' 5 उपाय करतील मदत

Shubman Gill साठी गौतम गंभीर, अजित आगरकर आग्रही होता, पण 'ते' दोघं नको म्हणाले अन् T20 World Cup संघातून पत्ता कट झाला

SCROLL FOR NEXT