कोकण

रंगकर्मी नितीन जोशी यांना प्रदान

CD

rat9p1.jpg -
03313
गुहागर : प्रसिद्ध रंगकर्मी नितीन जोशी यांना पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पटवर्धन स्मृतिगौरव पुरस्कार
रंगकर्मी नितीन जोशी यांना प्रदान
गुहागर, ता. ९ : गुहागर येथील श्रीदेव कोपरी नारायण देवस्थान फंड यांच्यातर्फे दिला जाणारा पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिगौरव पुरस्कार वरवडे (ता. रत्नागिरी) येथील रंगकर्मी नितीन वासुदेव जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. श्रीदेव कोपरी नारायणाच्या कार्तिक उत्सवात त्यांचा सन्मान केला गेला.
रत्नागिरीच्या ग्रामीण भागात तसेच राज्य नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून भरीव संगीत नाट्यसेवा केल्याबद्दल श्री. जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. कीर्तनकार असलेले आणि नाट्यचळवळीचा ध्यास घेतलेले श्री. जोशी हे अभिनय, दिग्दर्शन, रंगभूषाकार अशा विविधांगी भूमिका पार पाडत आहेत. पारावरचं नाटक असो वा स्पर्धेतील नाटक, ते सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. एक प्रगल्भ नाट्यविचार मांडणारे दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातील अनेक उदयोन्मुख कलाकारांना त्यांनी रंगभूमीवर आणले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी मान्यवरांकडून गोविंदरावांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आणि उत्सवी परंपरा उलगडण्यात आली. यावेळी प्रसिद्ध नाटककार अमेय धोपटकर यांनाही सन्मानित करण्यात आले. श्री. धोपटकर यांनी यावेळी नितीन जोशींचे नाट्यकार्य, त्याची व्याप्ती आणि त्यांची निर्भेळ खिलाडू वृत्ती विषद केली. तसेच संगीत नाटकाचा आज चालू असलेला प्रवास आणि संगीत राज्य स्पर्धेचा नाट्यप्रवाहावर पडलेला प्रभाव तसेच उत्सवी नाट्यनिर्मितीचा राज्य नाट्य स्पर्धेवर झालेला झालेला उपयुक्त परिणाम याबद्दलचा आशावादही व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT