कोकण

क्राइम

CD

‘त्या’ वाहनचालकावर गुन्हा
रत्नागिरी ः मंडणगड तालुक्यातील वेसवी ते वेळास जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने टेम्पो पार्क करणाऱ्या चालकाविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. ७) दुपारी करण्यात आली. अमोल मारुती ओवाळ (वय ४४, रा. वरची आळी, मु. वरखवाडी ता. वाई, जि. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पवार यांनी तक्रार दिली आहे.

सार्वजनिक ठिकाणी
मद्य पिणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात बेकायदेशीरपणे सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी करण्यात आली. सलीम आबू मुजावर ( वय ४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार रूपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे.

परटवणेत प्रौढाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः शहरातील परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना ६ नोव्हेंबरला रात्री घडली. संतोष एकनाथ पाटील (वय ५६, रा. परटवणे साईमंदिर, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सुरेश पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. त्यानुसार संतोष पाटील यांना दारूचे व्यसन होते. ते एका ठिकाणी राहात नसत. गेल्या १५ दिवसांपासून ते परटवणे येथे राहायला होते. दरम्यान, गुरूवारी सकाळी ते राहात असलेल्या घराच्या पडवीच्या बाहेर बेशुद्धावस्थेत पडलेले त्यांच्या पुतण्याला दिसून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संतोष पाटील यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


गणपतीपुळेत प्रौढाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील गणपतीपुळे येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ७) दुपारी ही घटना घडली. आशिष रमेश लाड (वय ४४, रा. अरिहंत बिल्डिंग साळवीस्टॉप, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी गणपतीपुळे येथे वॉटरस्पोर्ट जेटस्कीचे दुरुस्तीचे काम केल्यानंतर ते गणपतीपुळे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पोलिसचौकीच्या समोर उभे होतो. त्या वेळी त्यांना अचानकपणे चक्कर येऊन ते खाली पडले. तेथील नागरिकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्यकेंद्र मालगुंड येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दाऊदच्या मालमत्ता
लिलावाला प्रतिसाद नाही
खेड : कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मालमत्तांच्या लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने या मालमत्तांचा लिलाव पुन्हा आयोजित केला जाणार असल्याची माहिती सफेमा (Smugglers and Foreign Exchange Manipulators Act) कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. दाऊदचे मूळ गाव असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके येथे त्याची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. सक्षम प्राधिकरणाने (सफेमा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत) एकूण नऊ मालमत्तांचा लिलाव आयोजित केला होता; मात्र एकाही खरेदीदाराने बोली लावली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सफेमा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबके येथील चार भूखंड दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर होते. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांच्या निधनानंतर ही मालमत्ता अमिना बी यांच्या नावावर झाली व नंतर ती हसीना पारकर हिला हस्तांतरित करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

Mumbai Pod Taxi: मुंबईत सुरू होणार ‘स्मार्ट ट्रॅव्हल युग’! पॉड टॅक्सी प्रकल्प NCMC कार्डशी जोडला जाणार, आता प्रवास अधिक सोपा

Latest Marathi Breaking News: लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट; दिल्लीत हायअलर्ट जारी, एकाचा मृत्यू

Kullu Village Fire : हिमाचलच्या कुल्लुमधील गावात भीषण अग्नितांडव!, बघता बघता गावच पेटलं

Gold-Silver Price: सोन्याच्या दरात उसळी! तब्बल 'इतक्या' रुपयांची वाढ, भविष्यात दर कसे असतील?

SCROLL FOR NEXT