-rat१२p१३.jpg-
२५O०३९४४
रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त आरती करताना दाम्पत्य.
-rat१२p१४.jpg-
२५O०३९४५
ग्रामदैवत श्री देव भैरीच्या दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी.
-rat१२p१५.jpg-
P२५O०३९४६
मंदिराच्या प्रांगणात भजनसेवा करताना भजन मंडळी.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
-----
भैरीबुवाच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ
कालभैरव जयंती ; भजन, कीर्तनाने वातावरण भक्तीमय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे आज कालभैरव जयंती साजरी करण्यात आली. श्री देव भैरीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. धार्मिक कार्यक्रम, दिवसभर भजने, कीर्तन अशा कार्यक्रमांनी वातावरण भक्तीमय झाले.
मंदिरात कालभैरव जयंतीनिमित्त विविधरंगी फुलांची सुरेख आरास करण्यात आली. श्री देव भैरीचा गाभारा सुंदर आणि आकर्षक फुलांनी अतिशय देखणा सजवण्यात आला. सकाळी ७.३० वा. बारा वाड्यांच्यावतीने श्रीदेव भैरीवर अभिषेकाने विधीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि कालभैरव याग (होमहवन) झाला. त्यानंतर दिंडोरी प्रतिष्ठानचे श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रातर्फे (नाचणे) सामूहिक कालभैरवव्रत पठण करण्यात आले.
सत्यनारायण पूजा झाल्यानंतर आरतीसाठी भाविकांची भरपूर गर्दी मंदिरात झाली. आरतीनंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. हा महाप्रसाद सायंकाळपर्यंत सुरू होता. साधारण १ वाजण्याच्या सुमारास विविध भजनमंडळांची सुमधूर भजने सुरू झाली. ही एक अविस्मरणीय मेजवानी भाविकांना लाभली. यामध्ये श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, कृपासिंधू प्रासादिक भजन मंडळ, कालभैरव प्रासादिक भजन मंडळ यांची भजने रंगतदार झाली. सायंकाळी प्रवीण मुळ्ये यांनी कालभैरव जयंतीवर अतिशय सुरेख आणि सुरेल आवाजात कीर्तन केले. रात्री श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ यांचे भजन झाले. रात्री १२ वा. आरतीने जयंती कार्यक्रमाची सांगता झाली.
चौकट १
ट्रस्टचा सुवर्णमहोत्सव पुढील वर्षी
कालभैरव जयंती दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येते. भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली आहे. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचे आशीर्वाद घेऊन आपल्या नोकरी, व्यवसायाला जाणाऱ्यांची संख्याही खूप असते. पुढील वर्षी श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टला पन्नास वर्षे होणार आहेत. त्या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.